आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वीच मावळ तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे. लोणावळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्ष प्रवेश केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
लोणावळा उपशहरप्रमुख संजय भोईर, मनिषा भांगरे, पिंपरी-चिंचवडच्या महिला उपजिल्हाप्रमुख स्वरुपा खापेकर, व्यापारी असोसिएशनचे अॅड. कमलेश मुथा, पांडुरंग भाडेकर, मीना मांडे, संगीता आमटे, स्नेहल साळुंखे, काळोखे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांचे विकासाचे व्हिजन, दृरदष्टी, त्यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. त्यांना सन्मान दिला जाईल. सर्वांनी निवडणुकीच्या कामाला लागावे. ( Lonavala News Uddhav Thackeray Leaders join Eknath Shinde Shiv Sena Party )
अधिक वाचा –
– माय मराठीचा जागर! कान्हे शाळेत मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात साजरा । Marathi Bhasha Gaurav Din 2024
– तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीला प्रथम नगराध्यक्ष, सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे नाव देण्याची मागणी । Talegaon Dabhade
– महत्वाची बातमी! मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करण्याचे ॲड. राहुल नार्वेकर यांचे निर्देश