मावळ मतदारसंघाचा विकास करत असताना वाड्या-वस्त्यांवरही विकासकामे पोहोचवण्याचे कार्य आमदार सुनिल शेळके यांनी सातत्याने सुरु ठेवले आहे. मावळ तालुक्यातील सहा साकव पुल बांधण्यासाठी 2 कोटी 60 लाख रुपयांचा निधी आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
ग्रामीण भागातील छोटे ओढे, नाले अशा ठिकाणी वाड्या-वस्त्यांना मुख्य गावाशी जोडणाऱ्या रस्त्यांवर पुल नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती, ही अडचण ओळखून आमदार शेळके यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सहा साकव पुल नव्याने बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे. ( Fund Approved For Sakav Bridges In Maval Taluka MLA Sunil Shelke )
पुढील गावांमध्ये बांधण्यात येणार साकव पुल –
35 लक्ष निधीमधून आढले बु. येथे भगतवस्ती ते डोणे रस्त्यावर साकव बांधणे,
60 लक्ष निधीतून कोथुर्णे येथे ब्राम्हणोली रस्त्यावर साकव बांधणे,
35 लक्ष निधीतून पाचाणे आगळे वस्ती रस्त्यावर साकव बांधणे,
35 लक्ष निधीतून पाचाणे खिलारेवस्ती रस्त्यावर साकव बांधणे,
35 लक्ष निधीतून बेबडओहोळ ते ठाकर वस्ती रस्त्यावर साकव बांधणे,
60 लक्ष निधीतून शिवली ते येलघोल रस्त्यावर खडकवाडी साकव बांधणे,
अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीनुसार वाड्या-वस्त्यांना गावांशी जोडणारे साकव पूल होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी यांची गैरसोय दूर होणार आहे.व ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होईल. साकव बांधणे कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करावा व कामे दर्जेदार करून लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना आमदार सुनिल शेळके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अधिक वाचा –
– महत्वाची माहिती! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी नक्की वाचा, द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात मोठा बदल
– माय मराठीचा जागर! कान्हे शाळेत मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात साजरा । Marathi Bhasha Gaurav Din 2024
– तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीला प्रथम नगराध्यक्ष, सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे नाव देण्याची मागणी । Talegaon Dabhade