व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 29, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आण्णांचा आप्पांना विरोध! मावळ लोकसभेत नेमकं चाललंय काय? विद्यमान लोकप्रतिनिधींच्या भूमिकांची राज्यभर चर्चा । Maval Lok Sabha Election 2024

देशाची सार्वत्रिक निवडणूक अर्थात लोकसभा निवडणूक 2024 आता तोंडावर आहे. किंबहुना फक्त निवडणूकीचे पडघम वाजायचे राहिलेत, बाकी निवडणूकीचे वारे हे आधीच वाहू लागलेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 3, 2024
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा
Maval-Lok-Sabha-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशाची सार्वत्रिक निवडणूक अर्थात लोकसभा निवडणूक 2024 आता तोंडावर आहे. किंबहुना फक्त निवडणूकीचे पडघम वाजायचे राहिलेत, बाकी निवडणूकीचे वारे हे आधीच वाहू लागलेत. राज्यातील मागील अडीच वर्षांच्या काळातील राजकीय घडामोडींमुळे यंदाच्या लोकसभा निवडणूका या अधिक उत्साहाच्या आणि कांटे की टक्कर वाल्या होणार, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील 48 पैकी लोकसभेच्या प्रत्येक जागेवर वेगवेगळे राजकीय नाट्य जणू पाहायला मिळत आहे. त्यातही मावळ लोकसभेत ( Maval Lok Sabha Election 2024 )सुरु असलेल्या राजकीय नाट्याची चर्चा सबंध राज्यभर होत आहे. याचे कारण म्हणजे, मावळचे विद्यमान आमदार-खासदार दोघेही सत्तेत आहेत आणि दोघेही परस्परविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेत नेमके काय चाललंय? हाच प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

novel skill dev ads

मावळ लोकसभेतील सध्याचे चित्र –
मागील काही दिवसांपासून मावळ लोकसभा मतदारसंघावरून राज्यातील सत्ताधारी महायुती पक्षांत जोरदार रस्सीखेच होताना दिसत आहेत. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी सलग तिसऱ्यांदा आपली उमेदवारी स्वत:च जाहीर केली आहे. खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार आहेत. तर दुसऱ्या बाजूने भाजपाने मावळात कमल फुलवायचंच, या निर्धाराने बैठकांचा सपाटा लावला आहे. यात माजी मंत्री बाळा भेगडे यांचे नाव आघाडीवर आहे. आपल्याला माहितीच आहे की, भाजपा हाही महायुतीत आणि सत्तेत आहे. तिसरीकडे आमदार सुनिल शेळके यांनी देखील, मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळावी यासाठी रोखठोक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे ते श्रीरंग बारणे यांचाही विरोध करताना दिसत आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या तिन्ही नेत्यांनी मावळ लोकसभेवर आपला दावा सांगितल्याने, ह्या जागेचे काय होणार? यावर राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. ( Maval Lok Sabha Election 2024 MP Shrirang Barane MLA Sunil Shelke BJP Bala Bhegade )

आण्णांचा आप्पांना विरोध –
भाजपाने मावळच्या जागेवर दावा सांगताना बारणेंच्या उमेदवारीला विरोध केलेला नाही, परंतू श्रीरंग बारणे यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी भाजपाची मागणी असल्याची चर्चा सध्या होत आहे. अशात खासदार बारणेंची राजकीय कोंडी होऊ शकते. त्यात आमदार सुनिल शेळके यांनीही आपली स्पष्ट भुमिका घेतली असून त्यांचा बारणेंच्या उमेदवारीला विरोध दिसून येत आहे.

आमदार शेळकेंनी काय म्हटलंय?
श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे असले तरी ऐनवेळी ते कमळाच्या चिन्हावरही निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर आमदार शेळकेंना विचारले असता त्यांनी एका माध्यमाला आपली प्रतिक्रिया देताना, ‘मावळ तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी म्हणून माझ्या मतदारसंघातील जी लोकभावना आहे, ती मांडण्याचा माझ्या पक्षाकडे प्रयत्न केलेला आहे. पिंपरी चिंचवड, मावळ, कर्जत, पनवेल याठिकाणी राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक नगरसेवक राष्ट्रवादीसोबत आहेत. मी युतीचा धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे. पक्ष जो काही निर्णय देईल तो मानणारा कार्यकर्ता आहे. जोपर्यंत आम्हाला आमची भूमिका मांडता येईल. आम्हाला ही जागा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय,’ असं त्यांनी म्हटले.

tata ev ads

24K KAR SPA ads

तसेच, ‘मी 3 महिन्यापासून स्पष्टपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे नेते अजित पवार यांना मावळची जागा राष्ट्रवादीला आली पाहिजे ही मागणी करतोय. मावळची जागा मावळ तालुक्याला मिळावी. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर मावळला कधीही लोकसभेची संधी मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला फक्त होय म्हणावं, आमचा उमेदवार तयार आहे. तो उमेदवार मावळ तालुक्यातून दीड लाख मतांची आघाडी घेऊन पुढे जाईल, अशा पद्धतीचा उमेदवार आमची तयारी केली आहे,’ असे सुनिल शेळके म्हणालेत.

अधिक वाचा –
– वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Maval News
– शिवे गावात महिलांना आर्थिक उन्नतीसाठी तीन दिवसीय मसाला बनवणे प्रशिक्षण शिबिर । Khed News
– ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमाबद्दल मावळमधील कान्हे शाळेच्या 400 विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छापत्र


dainik maval ads

Previous Post

महत्वाची बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, लोकलच्या 14 फेऱ्या रद्द, पाहा यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Eknath-Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

To prevent mosquito breeding epidemic diseases Health Department conduct container survey at Takwe Budruk

डास उत्पत्ती होऊन साथीचे आजार बळावू नयेत याकरिता टाकवे बुद्रुक येथे आरोग्य विभागाकडून कंटेनर सर्वेक्षण । Maval News

July 29, 2025
Nag-Narasoba-Photo

श्रावण मास । नागपंचमी विशेष : श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप

July 29, 2025
Ramoshi community in Maval protests MLA Sharad Sonawane objectionable statement

आमदार शरद सोनावणे यांच्या आक्षेपार्ह विधानाचा मावळमधील रामोशी समाजाकडून तीव्र निषेध ; रस्त्यावर उतरण्याचा इशारा

July 28, 2025
Height weight gauge on Jambhul underpass collapsed due to heavy vehicle impact

अवजड वाहनाच्या धडकेने जांभूळ भुयारी रस्त्यावरील हाईट वेट गेज कोसळला ; वाहनचालकांची गैरसोय

July 28, 2025
Maval MP Shrirang Barne honored with Impressive and Consistent Contribution to Parliamentary Democracy award

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेतील सातत्यपूर्ण कामगिरी ठरतेय आदर्शवत ; दिल्लीत विशेष पुरस्काराने गौरव

July 28, 2025
Maval MP Shrirang Barne demanded inclusion of Dehuroad Cantonment Board in Pimpri-Chinchwad Municipal Corporation

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ; खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट

July 28, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.