मावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने 5 वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ डोस दिनांक 3 मार्च (रविवार) रोजी देण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 39,931 बालकांना 315 बूथ वर 754 कर्मचाऱ्यांना मार्फत पोलिओ डोस देण्यात आला. 95.7 टक्के काम झाले आहे. ह्यावेळी 3 कर्मचारी असणारे बूथ हे 124 होते, तर 2 कर्मचारी बूथ 191 असे होते. एकूण 39,931 बालकांना 0 ते 5 वर्षा मधील बालकांना पोलियो डोस देण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शँरन सँमसन सोनावणे यांनी सांगितले की, मावळ हा परिसरात ग्रामीण भाग असून या भागात अनेक आदिवासी डोंगराळ भाग आहे. तर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसतोड, वीटभट्टी कामगार मजुरी साठी मावळ तालुक्यात आले असल्याने पोलिओ डोस पासून एकही बालक राहता कामा नये, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बूध तयार करून सगळ्यांना पोलिओ चा डोस देण्यात आला. ( Pulse Polio Dose Was Given To 40 Thousand Children In Maval Taluka )
पवनमावळ, आंदरमावळ, नाणेमावळ परिसरात वीटभट्टी, आदिवासी वस्ती, उसतोड मजुराच्या लहान मुलांना घरोघरी जाऊन डोस देण्यात आले. यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ. शँरन सँमसन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा कार्यकर्ता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांनी पोलिओ डोस देण्यासाठी सहभाग घेतला होता.
अधिक वाचा –
– पुण्यातील वाहतूककोंडीवर जालीम उपाय! पुण्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी । Pune News
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रस्ता आणि ओपन जिमचे भूमिपूजन संपन्न । Pimpri Chinchwad
– ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान : अंतिम निकाल जाहीर, शासकीय गटात साखरा शाळा प्रथम, खाजगी गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूलची बाजी