व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रस्ता आणि ओपन जिमचे भूमिपूजन संपन्न । Pimpri Chinchwad

कस्पटे वस्ती वाकड येथे सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच ममतानगर सांगवी येथे ओपन जिमचे भूमिपूजन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 4, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
shrirang-barne-pimpri-chinchwad

Photo Courtesy : Team Dainik Maval


पिंपरी-चिंचवड : कस्पटे वस्ती वाकड येथे सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच ममतानगर सांगवी येथे ओपन जिमचे भूमिपूजन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे आभार मानले. याप्रसंगी माजी नगरसेवक संदीप अण्णा कस्पटे, सोसायटीचे चेअरमन मंगेश काकडे, ज्योती पाटील, अनिल दातार आणि सोसायटीतचे सर्व सभासद उपस्थित होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वाकड मधील कस्पटे वस्ती परिसरातील अनमोल रेसिडेन्सी सोसायटी परिसरात चांगला रस्ता नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी खासदार बारणे यांच्याकडे पाठपुरावा करून या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न केले. इथल्या रस्त्याची अवस्था खूप बिकट झाली होती. सोसायटीच्या सभासदांना रोज रहदारीसाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. याची तातडीने दखल घेऊन लगेच या रस्त्याच्या कामासाठी खासदार बारणे यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम लवकरच पूर्ण होऊन सोसायटीच्या सभासदांना उत्तम रस्ता उपलब्ध होणार आहे. ( Bhumi Pujan Of New Road at Wakad and open gym at Sangvi By Maval MP Shrirang Barne )

यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरात नगरविकास विभाग आणि एकूणच विविध विभागांच्या माध्यमातून मोठा निधी आणणे शक्य झाले आहे. खासदार निधी देखील मोठ्या प्रमाणात शहरातील विविध विकासकामांसाठी वापरण्यात आला आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना, ड्रेनेजच्या कामासाठी अमृत योजनेंतर्गत तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत निधी आणला आहे. कस्पटे वस्ती येथे चांगला रस्ता व्हावा ही नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास जात आहे.”

सांगवी मधील नागरिकांना व्यायामासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध –
सांगवी मधील ममतानगर परिसरात खासदार निधीतून ओपन जीमचे भूमिपूजन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. या ओपन जिमसाठी 30 लाखांचा निधी उपयोगी येणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, स्वरूपा खापेकर, विजय साने, चेतन शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कमलाकर जाधव, शितल शितोळे आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

या ओपन जीममुळे परिसरातील तरुणांना आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना उत्तम आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देत खासदार श्रीरंग बारणे यांनी ओपन जिमचा नागरिकांनी पुरेपूर उपयोग करावा असे आवाहन केले. खासदार निधी, महापालिका आदींच्या माध्यमातून सांगवीकरांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचेही खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहरात आमदार सुनिल शेळकेंचा झंझावात! एका दिवसात 17 ठिकाणी भूमिपूजन आणि नागरिकांशी संवाद
– शिळींब येथे आदिवासी कातकरी कुटुंबाची झोपडी जळून खाक; गरीब आदिवासी बांधवांना मदतीची प्रतिक्षा । Maval News
– दैनिक मावळ संवाद : पत्नीसोबत मोमोज खात असताना आयडीया सुचली आणि तिथूनच सुरु झाला नवा प्रवास… । Content Creator & Blogger Manoj Shinguste 


dainik maval jahirat

Previous Post

‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान : अंतिम निकाल जाहीर, शासकीय गटात साखरा शाळा प्रथम, खाजगी गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूलची बाजी

Next Post

पुण्यातील वाहतूककोंडीवर जालीम उपाय! पुण्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Traffic

पुण्यातील वाहतूककोंडीवर जालीम उपाय! पुण्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.