महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या वतीने शाळांकरिता राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा मावळ तालुक्यात द्वितीय क्रमांक आला आहे. मावळ तालुक्यातील प्राथमिक आणि खासगी अशा एकूण 429 शाळामंधून खासगी शाळेमध्ये तालुक्यात द्वितीय स्थान मिळवले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
यापूर्वी श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी शिष्यवृती आणि एनएमएसएस परिक्षेत गुणवत्ता यादीत चमकत असून पुन्हा एकदा या स्पर्धेत देखील आपली चमक मावळ तालुक्यात दाखवली आहे. विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे यांंच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संजय वंजारे आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचा-यांच्या सहकार्याने हे यश मिळवण्यात आले. ( mazi shala sundar shala campaign ekvira vidya mandir karla school second in maval taluka )
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, सचिव संतोष खांडगे, मावळ गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, माजी सभापती शरदराव हुलावळे, मा पं समिती सदस्य दिपक हुलावळे, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, केंद्रप्रमुख सुहास विटे यांंच्यासह सर्व ग्रामपंचात सदस्य व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सर्व संचालक व शिक्षक शिक्षेके-तर कर्मचारी, पालकवर्ग, कार्ला ग्रामस्थ या सर्वांकडून अभिनंदन होत आहे.
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते किवळे-विकासनगर भागातील 10 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन । MP Shrirang Barne
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात! ट्रक आणि ट्रेलर यांच्या धडकेत 2 जण जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway
– एका दुचाकी चोराला पकडले आणि चोरीला गेलेल्या 19 दुचाकींचा शोध लागला! तळेगाव दाभाडे पोलिसांची भन्नाट कामगिरी । Talegaon Dabhade