व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात! ट्रक आणि ट्रेलर यांच्या धडकेत 2 जण जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी (दि. 5 मार्च) रोजी भीषण अपघात झाला. Fatal accident on Mumbai Pune Expressway 2 people were killed in collision between truck and trailer.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 6, 2024
in महाराष्ट्र, लोकल, शहर
Accident-On-Mumbai-Pune-Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी (दि. 5 मार्च) रोजी भीषण अपघात झाला. द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान किलोमीटर 38.100 येथे हा अपघात झाला. एका भरधाव ट्रेलरने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या धडकेत एकूण 2 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 5.30 वाजता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मुंबई लेनवर कि.मी. 38:100 या ठिकाणी ट्रक (क्रमांक MH -43-Y -9455) चालक बाळू नामदेव मेटे (वय 57, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) हे कराड येथून नवीमुंबई कडे जात असताना त्यांचा मुलगा तथा क्लिनर राहुल बाळू मेटे (वय 26) हा ट्रकच्या उजव्या बाजूकडील टायरमधील हवा चेक करण्याकरिता उतरला होता. त्याचवेळी पाठीमागून येणारा ट्रेलर (क्रमांक MH-46-BM-3701) याची त्याला जोरात धडक बसली. त्यामुळे तो ट्रेलर खाली येऊन जागीच मयत झाला. ( Fatal accident on Mumbai Pune Expressway 2 people were killed in collision between truck and trailer )

त्याचवेळी ट्रेलर चालक विनोद गौड याने जोरात ब्रेक लावल्याने ट्रेलरवरील अंदाजे वीस टन वजनाच्या दोन लोखंडी कॉईल चैन लॉक तुटून निसटून ट्रेलरच्या केबिन वरून एक्सप्रेस वेच्या पहिल्या आणि तिसऱ्या लेनवर पडल्या. सुदैवाने कॉईलचा धक्का इतर कोणत्याही वाहनाला लागला नाही. मात्र दुर्दैवाने ट्रेलर चालक विनोद गौड हा केबिनमध्ये दबला आणि त्यात अडकून पडल्याने जागीच मयत झाला.

ह्या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाट आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्सचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा बलचे कर्मचारी, मृत्युंजय देवदूत, लोकमान्य हॉस्पिटल निगडीच्या रुग्णवाहिका आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांचे सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य करून मृतदेह बाहेर काढले. तसेच बाधित वाहने आणि कॉईल हटवून काही वेळ ठप्प झालेली वाहतूक मोकळी केली. दोनही मृतदेह खोपोली नगर पालिका रुग्णालयात पाठवण्यात आले. खोपोली पोलीस स्टेशनचे हद्दीत ही घटना घडल्याने अपघाताची रीतसर नोंद तिथे करण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामाचे उद्घाटन । PM Narendra Modi
– पवनमावळ विभागातील घारखेल माथा ते आढले-पुसाणे रस्त्यासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी उपलब्ध; रस्त्याचे भूमिपूजनही संपन्न
– सोमाटणे-परंदवडी रस्ता ते सोमाटणे गावठाण रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाखांचा निधी; आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन


Previous Post

एका दुचाकी चोराला पकडले आणि चोरीला गेलेल्या 19 दुचाकींचा शोध लागला! तळेगाव दाभाडे पोलिसांची भन्नाट कामगिरी । Talegaon Dabhade

Next Post

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते किवळे-विकासनगर भागातील 10 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन । MP Shrirang Barne

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MP-Shrirang-Barane

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते किवळे-विकासनगर भागातील 10 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन । MP Shrirang Barne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.