व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामाचे उद्घाटन । PM Narendra Modi

बुधवारी (दि. 6) सकाळी सव्वा दहा वाजता पीसीएमसी मेट्रो स्थानक येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कामाचे उद्घाटन करणार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 5, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
PM-Narendra-Modi

Photo Courtesy : Team Dainik Maval / File Image


पिंपरी पासून निगडी पर्यंत मेट्रोमार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी शहरवासियांनी अनेकदा आंदोलने केली. तसेच जनभावनेचा आदर करत खासदार श्रीरंग बारणे यांनी मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या कामाचा मुहूर्त ठरला आहे. बुधवारी (दि. 6) सकाळी सव्वा दहा वाजता पीसीएमसी मेट्रो स्थानक येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कामाचे उद्घाटन करणार आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

महामेट्रो कडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या दोन मार्गिकांवर काम सुरु आहे. त्यातील काही भाग दोन टप्प्यांत प्रवासी वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. या मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन आणि दोन्ही टप्प्यातील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. आता पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाच्या कामाचे देखील उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ( Prime Minister Narendra Modi will inaugurate work of Pimpri to Nigdi Metro line online )

स्वारगेट ते पिंपरी या मार्गीकेवरील दापोडीतील हॅरिस ब्रिजपासूनचा मेट्रो मार्ग पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत येतो. मेट्रो पिंपरी पर्यंत आली मात्र ती निगडी पर्यंत सुरु होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार महामेट्रो कडून या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्याला राज्य शासनाची परवानगी मिळाली आणि हा अहवाल केंद्राकडे गेला. त्यानंतर याला मंजुरी मिळण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

महापालिकेने देखील या प्रकल्पाला सहमती दर्शवली. त्यानंतर पिंपरी ते निगडी या विस्तारीकरणाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने 23 ऑक्टोबर 2023 रोजी मान्यता दिली. पिंपरी स्थानकाजवळील एम्पायर इस्टेट पुलापर्यंत मेट्रो मार्गाचे काम झाले आहे. सध्या तिथे मेट्रो यार्ड आहे. तेथून पुढे मार्ग विस्तारीकरणाचे नियोजन आहे. पिंपरी ते निगडी दरम्यान चिंचवड स्टेशन (महावीर चौक व अहिंसा चौक दरम्यान), आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडी (टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक दरम्यान) अशी तीन स्थानके असणार आहेत. या कामासाठी 910 कोटी 18 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. बुधवारी उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हे काम 39 महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असे म्हटले जात आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी ते भक्ती शक्ती पर्यंतच्या मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम आता सुरु होत आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या स्वप्नांचा यानिमित्ताने विस्तार होत आहे. हा मेट्रो मार्ग पुढे किवळे, मुकाई चौक आणि वाकड चौकापर्यंत जाण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हिंजवडीपर्यंत आलेला मेट्रो मार्ग नाशिक फाटा मार्गे चाकण पर्यंत विस्तारित करण्यासाठी देखील मी पाठपुरावा करत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.”

अधिक वाचा –
– सुदुंबरे येथील सिद्धांत महाविद्यालयात शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण सत्र; नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम
– शिवली-भडवली ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनलला झटका! सरपंचपदाच्या निवडणूकीत माधुरी आडकर विजयी । Gram Panchayat Election
– लोणावळ्यातील रामनगर भागात जबरी चोरी! एकाच रात्री तीन घरात घरफोडी, तब्बल 3 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लंपास । Lonavala Crime News


dainik maval jahirat

Previous Post

पवनमावळ विभागातील घारखेल माथा ते आढले-पुसाणे रस्त्यासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी उपलब्ध; रस्त्याचे भूमिपूजनही संपन्न

Next Post

वेहेरगाव जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा; माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा । Karla News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Karla-Vehergaon-School-Anniversary

वेहेरगाव जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा; माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.