व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वेहेरगाव जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा; माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा । Karla News

आई एकविरादेवी मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेहेरगाव, ह्या शाळेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 6, 2024
in लोकल, ग्रामीण
Karla-Vehergaon-School-Anniversary

Photo Courtesy : Team Dainik Maval


आई एकविरादेवी मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेहेरगाव, ह्या शाळेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शताब्दी वर्षपूर्ती निमित्त माजी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकत्रित येत केक कापून शाळेचा शंभरावा वाढदिवस साजरा केला. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत आणि 100 विद्यार्थ्यांनी 100 फुगे हवेत सोडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने शताब्दी सोहळा साजरा केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

खूप वर्षांनी शाळेतील सर्व गुरुजन आणि त्यांचे विद्यार्थी यांची भेट या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडली. त्यामुळे सर्वजण आनंदीत होते, तर अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील विद्यार्थिनींनी माजी शिक्षकांचे औक्षण करून स्वागत केले. तर उपस्थित माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. ( 100th Anniversary Of Zilla Parishad School Vehergaon Celebrated With Enthusiasm )

वेहरगावच्या सरपंच वर्षा मावकर, उपसरपंच शंकर बोरकर, केंद्रप्रमुख सुहास विटे, माजी उपसरपंच काजल पडवळ, ग्राम पंचायत सदस्य राजु देवकर, अनिल गायकवाड, सदस्या पुजा पडवळ, शालेय समिती अध्यक्ष संतोष देवकर, उपाध्यक्ष लिना रसाळ, पोलिस पाटील अनिल पडवळ, मुख्याध्यापिका निलीमा वरे आदिजण यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर शाळेचे सध्याचे शिक्षकवृंद आणि विद्यार्थीही कार्यक्रमात सहभागी होते.

सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देवकर, उपाध्यक्ष लीनाताई रसाळ तसेच सर्व व्यवस्थापन सदस्य यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले. मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका निलीमा वारे यांनी केले. प्रास्ताविक कल्याणी रासकर, सूत्रसंचालन विकास कांबळे आणि कविता चासकर यांनी केले. तर, कार्यक्रमाअंती उपस्थितांचे आभार श्रीमती मनिषा कांबळे यांनी मानले.

अधिक वाचा –
– सोमाटणे-परंदवडी रस्ता ते सोमाटणे गावठाण रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाखांचा निधी; आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– सुदुंबरे येथील सिद्धांत महाविद्यालयात शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण सत्र; नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम
– शिवली-भडवली ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनलला झटका! सरपंचपदाच्या निवडणूकीत माधुरी आडकर विजयी । Gram Panchayat Election


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामाचे उद्घाटन । PM Narendra Modi

Next Post

एका दुचाकी चोराला पकडले आणि चोरीला गेलेल्या 19 दुचाकींचा शोध लागला! तळेगाव दाभाडे पोलिसांची भन्नाट कामगिरी । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
talegaon-dabhade-police

एका दुचाकी चोराला पकडले आणि चोरीला गेलेल्या 19 दुचाकींचा शोध लागला! तळेगाव दाभाडे पोलिसांची भन्नाट कामगिरी । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.