मावळ लोकसभा मतदारसंघातील वाड्यावस्त्यांमध्ये विखुरलेला, आदिवासी पाडे असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघातील 100 हून अधिक गावांतील विकास कामांसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी निधी देत विकासाला चालना दिली. गावांमधील अंतर्गत रस्ते, पाण्याची व्यवस्था, समाज मंदिरे, दिव्यांची व्यवस्था केली. त्यामुळे विकासापासून काहीसे दूर असलेल्या मावळमधील अनेक गावांतील पायाभूत सुविधा सक्षम झाल्या आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्वाधिक निधी मावळ तालुक्याला दिला आहे. नगरविकास, खासदार स्थानिक विकास आणि जिल्हा नियोजन समितीमधून बारणे यांनी निधी मिळविला. मावळ तालुक्यातील विविध विकास कामांसाठी भरीव निधी दिला. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने निधी मिळविण्यात कोणतीही अडचण आली नाही. शासनाने मावळच्या विकासासाठी पाठबळ दिले. खासदार स्थानिक विकास निधी ग्रामपंचायतीला देण्यात आला. खासदार बारणे यांनी गावांगावांमधील विकास कामात राजकारण येऊ दिले नाही. ग्रामपंचायतीत कोणत्याही पक्षाची सत्ता आहे, हे पाहिले नाही. पक्षीय राजकारण पाहिले नाही. प्रत्येक गावाच्या विकासासाठी निधी दिला आहे. ( Development fund to many villages in Maval taluka from MP Shrirang Barane )
खासदार बारणे सातत्याने मतदारांच्या संपर्कात असतात. ग्रामस्थांनी निधी मागणी केली की निधी दिला जातो. गावागावामधील अंतर्गत रस्ते पक्के केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. खासदार बारणे यांच्या निधीतून, त्यांनी पाठपुरावा करुन आणलेल्या निधीतून कोणते काम झाले. याबाबतची माहिती देणारे फलक मावळमधील गावांमध्ये लावले आहेत. हे फलक नागरिकांचे लक्ष्य वेधून घेत आहे.
अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कामाने घेतला वेग, आंदर मावळातील पर्यटनाला मिळणार चालना । Maval Taluka News
– ‘श्रीरंग बारणे हे दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार झालेले दिसतील’ – मंत्री उदय सामंत । Maval Lok Sabha Election 2024
– पांदण रस्ता खुला करण्यासाठी टाकवे ग्रामस्थ आक्रमक; जलजीवन मिशनचे काम अडवले । Maval Taluka