मावळ लोकसभा (Maval Lok Sabha) मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) नेमका कोण उमेदवार असणार, याचं उत्तर काही अजून मिळालेले नाही. परंतू ही जागा महायुतीतील सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनल्याचे दिसत आहे. कारण महायुतीतील भाजपा (BJP) राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP) आणि शिवसेना शिंदे गट (Shivsena) यांच्यात या जागेसाठी मोठी रस्सीखेच सुरु आहे. तिसऱ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागलेले विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) एकीकडे आणि त्यांना विरोध करणारे राष्ट्रवादी भाजपाचे नेते दुसरीकडे अशी परिस्थिती मावळ लोकसभेत आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
अशात मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीची जागा भाजपला मिळावी, यासाठी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शनिवारी (दि. 16 मार्च) माजी मंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade) यांच्या तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचे रुपांतर नंतर बैठकीत झाले. या बैठकीत बोलताना अनेकांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर टीकेची झोड उठवली. भाजपला उमेदवारी मिळाली नाही तर प्रसंगी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला. तसेच कोणत्याही परिस्थितीत बारणे यांचे काम करणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. यासह मावळ लोकसभेला देखील कमळ आणि विधानसभेला देखील कमळ असा निर्णय सर्वांनी केला. महत्वाचे म्हणजे मावळ लोकसभेत बाळा भेगडे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी वरिष्ठांना साकडे घालण्याचे पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे.
एकीकडे मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील हे निवडणुकीसाठी इच्छुक असून तशी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यात जमा आहे, आणि ते कामालाही लागल्याचे दिसत आहे. परंतु दुसरीकडे मात्र महायुतीत आता उमेदवारीवरून दररोज वेगवेगळे आरोप प्रत्यारोप घडताना दिसत आहेत. त्यामुळे आता मावळ लोकसभेसाठी श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा शिवसेना तिकीट देणार? की ही जागा भाजपा किंवा राष्ट्रवादीला सोडणार याबाबत लवकरच समजले. ( Maval Lok Sabha Constituency BJP against MP Shrirang Barane Urge for candidature of Bala Bhegade )
अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं, देशात सात टप्प्यात होणार मतदान, 4 जून रोजी अंतिम मतमोजणी, वाचा A टू Z माहिती
– मावळ भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान, गावोगावी जाऊन केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद । Maval BJP
– तिकोना पेठ येथे विहिरीत पडलेल्या विषारी सापाला जीवदान, सर्पमित्राने विहिरीत उतरुन पकडला साप, धाडसाचे होतंय कौतूक