शिवसेना पक्षाचे अर्थात महायुतीचे मावळचे अधिकृत उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) पिंपळेगुरव येथे भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. तसेच चिंचवड परिसरात प्रचाराला सुरुवात केली. महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच श्रीरंग बारणे यांनी लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक शशिकांत कदम, उद्योजक रवि नामदे उपस्थित होते. खासदार बारणे यांनी जगताप यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली. आमदार अश्विनी जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासोबत संवाद साधला. लक्ष्मणभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार… हे साध्य करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे काम सुरु आहे. महायुतीची अधिकृत उमेदवारी खासदार श्रीरंग बारणे यांना जाहीर झाली आहे. उमेदवार निश्चित झाल्याने भाजपने झोकून देऊन काम सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी शहर भाजपची संघटना, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दरम्यान, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हे उद्या रविवारी तळेगावदा भाडे येथे जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके तसेच भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे समजते. ( Mahayuti candidate MP Shrirang Barane took Visiting memorial site of MLA Laxman Jagtap Maval Lok Sabha )
मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात सामना जवळपास निश्चित झाला आहे. सलग तीन निवडणुकांत शिवसेनेनं ताकद दाखवल्यानंतर दोन गटांत तुंबळ लढाई होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदारांचाही विरोध जवळपास मावळला आहे. त्यामुळे आता श्रीरंग बारणे महायुतीचे अधिकृत उमेदवार झाले आहेत.
महायुतीतील मित्रपक्ष भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. भाजपने कमळावर उमेदवार असावा, अशी मागणी केली होती, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मावळावर दावा ठोकला होता. खासदार बारणे हे कमळावर निवडणूक लढवतील, अशी अनेक दिवस चर्चा होती, परंतु या चर्चेवर पडदा टाकत त्यांनी आपले नाव शिवसेनेच्या यादीत असेल असे स्पष्ट केले होते. अखेरीच शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यात बारणेंना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
दरम्यान, श्रीरंग बारणे यांनी मावळातून पहिल्यांदा 2014 साली लोकसभेची निवडणुक लढवली होती. त्यात त्यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 साली देखील त्यांनी आपला मतदारसंघ आपल्याच ताब्यात राखला. तर 2019 साली पुन्हा बारणे विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी सज्ज झाले आहेत. मावळ मतदारसंघ दोन जिल्ह्यांत विभागला असला तरी यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक आणि दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. बारणे हे थेरगावमधील तर वाघेरे पिंपरी गावातील रहिवासी आहेत. दोन्ही स्थानिक उमेदवार असल्याने गावकी-भावकीच्या मतांची विभागणी होणार आहे. याचा फायदा कोणाला होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अधिक वाचा –
– वडगाव मावळ शहरात राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा । Vadgaon Maval
– निलेश लंकेंचा अजितदादांना ‘रामराम’, आमदारकीचा राजीनामा देताना अश्रू अनावर, लोकसभेची ‘तुतारी’ फुंकली । mla nilesh lanke resigned ncp
– रेल्वेच्या गर्दीमुळे पोलिसाचा मृत्यू, कर्तव्याला जाताना डोंबिवली-कोपर दरम्यान धावत्या गाडीतून पडले