व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निलेश लंकेंचा अजितदादांना ‘रामराम’, आमदारकीचा राजीनामा देताना अश्रू अनावर, लोकसभेची ‘तुतारी’ फुंकली । mla nilesh lanke resigned ncp

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके ह्यांनी आज (दि. 29) आमदारकीचा राजीनामा दिला. मात्र राजीनाम्याची घोषणा करताना लंके कार्यकर्त्यांसमोर अक्षरशः रडले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 29, 2024
in महाराष्ट्र
nilesh-lanke

Photo Courtesy : FB / Nilesh Lanke


mla nilesh lanke resigned ncp : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके ह्यांनी आज (दि. 29) आमदारकीचा राजीनामा दिला. मात्र राजीनाम्याची घोषणा करताना लंके कार्यकर्त्यांसमोर अक्षरशः रडले. आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा करताना त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना त्यांनी जनतेची आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली. तसेच, आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण व्हायला सहा महिने शिल्लक असताना आपण राजीनामा देतोय याचं वाईट वाटतंय. पण आपल्याला दिल्लीत जाऊन भूमिका मांडायची आहे. काम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल, अशी भूमिका निलेश लंके यांनी मांडली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश –
आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा करत असतानाच लंके यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश देखील केला. निलेश लंके यांनी राजीनाम्यापाठोपाठ मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपल्याला लोकसभा निवडणूक लढायची आहे, असे निलेश लंके म्हणाले. त्यावेळी निलेश लंके यांनी अधिकृतपणे शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचा फोटो आपल्या हातात घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.


आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लंके सुजय विखेंविरोधात मैदानात उतरणार आहेत.

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके हे श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार का? । Maval Lok Sabha Election 2024
– महत्वाची बातमी! पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालय मार्च अखेरीस सुट्टीच्या दिवशी देखील सुरु राहणार । Pimpri Chinchwad Regional Transport Office
– लोकसभा निवडणूकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी 135 भरारी पथके आणि 129 स्थिर सर्वेक्षण पथके तैणात । Lok Sabha Election 2024


dainik maval jahirat

Previous Post

रेल्वेच्या गर्दीमुळे पोलिसाचा मृत्यू, कर्तव्याला जाताना डोंबिवली-कोपर दरम्यान धावत्या गाडीतून पडले

Next Post

वडगाव मावळ शहरात राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shivjayanti-vadgaon-maval

वडगाव मावळ शहरात राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.