मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे हे सोमवारी (दि. 22 एप्रिल) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बारणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
खासदार बारणे हे सोमवारी सकाळी 10 वाजता आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने पीएमआरडीए कार्यालयापर्यंत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्यासह महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा खापरे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, असे सांगितले जात आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. चिंचवड, पिंपरी, मावळ, कर्जत-खालापूर, पनवेल व उरण या सहाही विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते आकुर्डी येथे येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ( Maval Lok Sabha Constituency Shrirang Barane will fill nomination form On 22nd April In presence of CM Shinde )
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खासदार बारणे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केलीये. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या प्रचाराची दुसरी फेरी सुरू होईल. त्यात अनेक बड्या नेत्यांच्या सभांचाही समावेश असणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे मंगळवारी अर्थात 23 एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अधिक वाचा –
– दुःखद ! वडगाव शहरातील अजातशत्रू व्यक्तिमत्व, पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांचे निधन । Vadgaon Maval
– वडगावात मनसेकडून खळ्ळं खट्याक! ग्रामदैवताच्या मंदिराजवळील अवैध ताडी केंद्रावर चालवला बुलडोझर – पाहा व्हिडिओ
– पुणे जिल्हा : आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पथकाची कारवाई । Pune News