व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Maval Lok Sabha : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणे भरणार उमेदवारी अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे हे सोमवारी (दि. 22 एप्रिल) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 21, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
mp-shrirang-barne

Photo Courtesy : PR / Mp Shrirang Barne


मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे हे सोमवारी (दि. 22 एप्रिल) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बारणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

खासदार बारणे हे सोमवारी सकाळी 10 वाजता आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने पीएमआरडीए कार्यालयापर्यंत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्यासह महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा खापरे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, असे सांगितले जात आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. चिंचवड, पिंपरी, मावळ, कर्जत-खालापूर, पनवेल व उरण या सहाही विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते आकुर्डी येथे येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ( Maval Lok Sabha Constituency Shrirang Barane will fill nomination form On 22nd April In presence of CM Shinde )

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खासदार बारणे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केलीये. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या प्रचाराची दुसरी फेरी सुरू होईल. त्यात अनेक बड्या नेत्यांच्या सभांचाही समावेश असणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे मंगळवारी अर्थात 23 एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अधिक वाचा –
– दुःखद ! वडगाव शहरातील अजातशत्रू व्यक्तिमत्व, पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांचे निधन । Vadgaon Maval
– वडगावात मनसेकडून खळ्ळं खट्याक! ग्रामदैवताच्या मंदिराजवळील अवैध ताडी केंद्रावर चालवला बुलडोझर – पाहा व्हिडिओ
– पुणे जिल्हा : आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पथकाची कारवाई । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

उष्माघात म्हणजे काय? लहान मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे कशी ओळखावी? उष्णतेच्या लाटेदरम्यान आहार कसा असावा? जाणून घ्या

Next Post

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या चिंचवडमधील पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog Waghere Maval

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या चिंचवडमधील पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.