तळेगाव दाभाडे शहरात भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तळेगाव शहरातून भगवान महावीर यांची रथयात्रा काढण्यात आली. रथयात्रेत शेकडो जैन बांधवांनी सहभाग घेतला होता. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जैन सोशल ग्रुप तळेगाव दाभाडे यांच्या वतीने यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जैन सोशल ग्रुप गेली 26 वर्ष सातत्याने रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवत आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या रक्तदान उपक्रमात 67 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना समीर धनराज परमार यांच्यातर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. रक्त संकलन गरवारे ब्लड बँक तळेगाव दाभाडे यांनी केले. ( Blood Donation Camp at Talegaon Dabhade on occasion of Lord Mahavir Janm Kalyanak Day )
यावेळी 103 जणांचे हाडांच्या ठिसूळपणाचे चेकअप आणि 270 जणांची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली. याचे नियोजन जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष हितेश राठोड, इंद्रकुमार ओसवाल, समीर परमार, राकेश ओसवाल, संजय ओसवाल, नितीन शहा, संजय मेहता, भरत राठोड आणि जैन सोशल ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केले होते. प्रकल्प प्रमुख म्हणून किरण ओसवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अधिक वाचा –
– उष्माघात म्हणजे काय? लहान मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे कशी ओळखावी? उष्णतेच्या लाटेदरम्यान आहार कसा असावा? जाणून घ्या
– पाच हजार नागरिकांना घडविणार अयोध्या दर्शन, मोरया प्रतिष्ठानचा संकल्प, नावनोंदणी सुरु । Vadgaon Maval
– दुःखद ! वडगाव शहरातील अजातशत्रू व्यक्तिमत्व, पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांचे निधन । Vadgaon Maval