व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘वंचित’च्या एन्ट्रीमुळे मावळ लोकसभेत होणार ‘तिरंगी’ लढत, मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला? । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी (दि. 20 एप्रिल) वंचित बहुजन आघाडीने मावळ लोकसभेसाठी माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 22, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Shrirang Barne Sanjog Waghere Madhavi Joshi

Photo Courtesy : Team Dainik Maval


Maval Lok Sabha Constituency : मावळ लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी (दि. 20 एप्रिल) वंचित बहुजन आघाडीने मावळ लोकसभेसाठी माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर केली. मावळ लोकसभा मतदारसंघाठी गुरुवारपासून (दि. 18 एप्रिल) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला झाला आहे. कर्जत येथील माधवी जोशी या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मावळ लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. परंतू, महाविकास आघाडीत मावळची जागा ही ठाकरे गटाला सुटली. त्यामुळे माधवी जोशी यांनी शनिवारी (दि. 20) वंचितमध्ये प्रवेश करत थेट मावळ लोकसभेची उमेदवारी मिळविली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

माधवी जोशी यांच्यामुळे अर्थात वंचितच्या एन्ट्रीमुळे मावळ लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे. मावळ लोकसभेत महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत, तर पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी दादा गटाचे अन् पिंपरी-चिंचवडे माजी महापौर संजोग वाघेरे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहे, आणि त्यात वंचितच्या माधवी जोशी यांनाही उमेदवारी जाहीर झालीये. त्यामुळे मावळ लोकसभेची ही तिरंगी लढत अटीतटीची होणार हे निश्चित. ( Maval Lok Sabha Constituency Fight Between Three Candidates Shrirang Barne Sanjog Waghere Madhavi Joshi )

दरम्यान वंचितच्या उमेदवारामुळे मतांची विभागणी होणार, हेही दिसतंय. याचे कारण गेल्यावेळी वंचितच्या उमेदवाराने (राजाराम पाटील) जवळपास लाखभर मते घेतली होती. आता यावेळी माधवी जोशी या वंचितच्या उमेदवार आहेत. त्यांनी स्वतः वर्षभर निवडणूकीसाठी कंबर कसली होती. त्यात त्या घाटाखालून म्हणजेच कर्जत येथून येतात. घाटाखाली मावळ लोकसभेतील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे जोशींना तिथे मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात तिरंगी लढतीमुळे संपूर्ण मावळ लोकसभेत होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा नक्की कोणाला होतो, हे 4 जून रोजीच समजेल.

अधिक वाचा –
– Maval Lok Sabha : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणे भरणार उमेदवारी अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी
– उष्माघात म्हणजे काय? लहान मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे कशी ओळखावी? उष्णतेच्या लाटेदरम्यान आहार कसा असावा? जाणून घ्या
– पाच हजार नागरिकांना घडविणार अयोध्या दर्शन, मोरया प्रतिष्ठानचा संकल्प, नावनोंदणी सुरु । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथे भव्य रक्तदान शिबिर । Talegaon Dabhade

Next Post

अभिनंदन! सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सचिन शेडगे यांना मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते ‘वीर कोयाजीराव बांदल पुरस्कार’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Veer Koyajirao Bandal Award

अभिनंदन! सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सचिन शेडगे यांना मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते 'वीर कोयाजीराव बांदल पुरस्कार'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.