व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अभिनंदन! सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सचिन शेडगे यांना मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते ‘वीर कोयाजीराव बांदल पुरस्कार’

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे दुर्गसेवक सचिन शेडगे यांना मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते 2024 सालचा 'वीर कोयाजीराव बांदल पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 22, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
Veer Koyajirao Bandal Award

Photo Courtesy : Team Dainik Maval


सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे दुर्गसेवक सचिन शेडगे यांना मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते 2024 सालचा ‘वीर कोयाजीराव बांदल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वीर कोयाजीराव बांदल शौर्य दिनी त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सचिन शेडगे हे मागील अनेल वर्षांपासून त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

एप्रिल 1663 साली लाल महाल येथे शाहिस्तेखानावर झालेल्या हल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत वीर कोयाजीराव बांदल हेही होते. त्यांच्या या शौर्याचा गौरव म्हणून दरवर्षी वीर कोयाजीराव बांदल शौर्य दिन नियोजन समिती, हिरडस मावळ, भोर प्रांत यांच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. यंदा 21 एप्रिल रोजी शौर्य दिनाचे औचित्य साधून मराठा आरक्षण लढ्यातील नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर पुरस्कार वितरण करण्यात आले. ( Sahyadri Foundation Veer Koyajirao Bandal Award to Sachin Shedge by Manoj Jarange Patil )

‘वीर कोयाजीराव बांदल पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी वीर कोयाजीराव बांदल शौर्यदिन नियोजन समितीचे मनपूर्वक आभार मानतो. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून गडकिल्यांच्या संवर्धनासाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या आमच्या सह्याद्रीच्या सर्व दुर्गसेवकांचा आहे. तुंग दुर्गाच्या संवर्धनासाठी झटलेल्या प्रत्येक दुर्गसेवकांना हा पुरस्कार समर्प्रित करत आहे.’ असे सचिन शेडगे यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या चिंचवडमधील पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval Lok Sabha
– Maval Lok Sabha : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणे भरणार उमेदवारी अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी
– उष्माघात म्हणजे काय? लहान मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे कशी ओळखावी? उष्णतेच्या लाटेदरम्यान आहार कसा असावा? जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

‘वंचित’च्या एन्ट्रीमुळे मावळ लोकसभेत होणार ‘तिरंगी’ लढत, मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला? । Maval Lok Sabha

Next Post

पावसाळ्यात मुंबई-पुणे रेल्वे सेवा चालणार सुरळीत, मध्य रेल्वेकडून कर्जत-लोणावळा घाटाची पाहणी, मान्सूनपूर्व कामांनी घेतला वेग

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mumbai Pune railway service Karjat Lonavla ghat Central Railway

पावसाळ्यात मुंबई-पुणे रेल्वे सेवा चालणार सुरळीत, मध्य रेल्वेकडून कर्जत-लोणावळा घाटाची पाहणी, मान्सूनपूर्व कामांनी घेतला वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.