ईव्हीएमवरील मतदानांनतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठीबाबत व्हॉट्सॲप वरुन एक चित्रफीत व त्यासोबत संदेश प्रसारीत होत असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी चाचणी मतदानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रसारीत होत असलेला संदेश हा मतदानाच्या दिवशी, मतदान करताना मतदाराने ज्या पक्षाला मतदान केले आहे त्या पक्षाची चिठ्ठी व्हीव्हीपॅटमध्ये खाली पडताना न दिसल्यास हरकत घेण्याबाबतच्या आशयाचा आहे. ( Viral message on WhatsApp regarding EVM VVPAT machine )
त्या अनुषंगाने एखाद्या मतदाराने त्याने केलेले मतदान हे इतर उमेदवारास दर्शवित असल्याबाबत अभिकथन केले असल्यास सदर मतदारास निवडणूक संचालन नियम १९६१ च्या नियम ४९ एमए अन्वये चाचणी मतदान करणेसाठी प्रतिज्ञापत्र सादर करावयाची तरतुद आहे.
तसेच सदर प्रतिज्ञापत्रकात मतदाराने केलेले अभिकथन चुकीचे आढळल्यास भारतीय दंड सहिता कलम १७७ अन्वये दंडात्मक तरतूद असल्याबाबतचेदेखील नमूद आहे, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– ‘श्रीरंग बारणे यांचा पराभव करून मी माझा भाऊ पार्थ पवार याच्या पराभवाचा वचपा काढणार’ – आमदार रोहित पवार । Maval Lok Sabha
– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण, महाराष्ट्रातील 5 मान्यवरांचा समावेश । Padma Awards 2024
– जोरदार शक्तिप्रदर्शन करत मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha