व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अब्जाधीश ‘आप्पा’ ! 5 वर्षात 29 कोटींची वाढ, श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती किती? हिरे-सोने, महागड्या गाड्या आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Shrirang Barane Property

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सोमवारी (दिनांक 22 एप्रिल) जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 24, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Shrirang Barane Property

Photo Courtesy : Team Dainik Maval


Maval Lok Sabha Constituency Candidate Shrirang Barane Property : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सोमवारी (दिनांक 22 एप्रिल) जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळ लोकसभेतील 6 विधानसभा मतदारसंघाचे आमदार उपस्थित होते. बारणे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाकडे प्रतित्रापत्र सादर केले आहे. ह्या प्रतिज्ञापत्रानुसार श्रीरंग बारणे यांच्याकडे तब्बल 131 कोटी इतकी संपत्ती आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

श्रीरंग बारणे यांची संपत्ती :
जंगम मालमत्ता – 15 कोटी 56 लाख 10 हजार 091 रुपये
स्थावर मालमत्ता – 90 कोटी 73 लाख 39 हजार 996 रुपये
एकूण – 106 कोटी 29 लाख 50 हजार 087 रुपये

पत्नी सरिता श्रीरंग बारणे यांची संपत्ती :
जंगम मालमत्ता – 1 कोटी 18 लाख 66 हजार 878 रुपये
स्थावर मालमत्ता- 24 कोटी 37 लाख 74 हजार 666 रुपये
एकूण मालमत्ता – 25 कोटी 56 लाख 41 हजार 544

बारणे कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता – 131 कोटी 85 लाख 91 हजार 631 रुपये
श्रीरंग बारणे यांच्यावरील एकूण कर्ज – 85 लाख 28 हजार 711 रुपये
शेती, बांधकाम व्यावसायिक आणि वीट कारखानदारी हे व्यवसाय असणारे बारणे यांची एकूण संपत्ती ही 131 कोटी इतकी आहे. यासह त्यांच्या विविध बँकांमध्ये मुदत, बचत ठेवी, शेअर्स, विमापत्रे, भागभांडवल आहेत. तसेच त्यांनी 6 जणांना त्यांनी कर्ज दिले आहे. ( Maval Lok Sabha Constituency Total wealth of Shiv Sena candidate Shrirang Barane )
हेही वाचा – संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची संपत्ती! मुलाला 1 कोटी दिले पण स्वतःला गाडी नाही, गुन्हे – पिस्तूल आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Sanjog Waghere Property

पाच वर्षांत संपत्तीत 29 कोटींची वाढ –
खासदार श्रीरंग बारणे यांनी 2014 आणि 2019 मध्ये देखील मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती, आणि ते सलग दोनदा जिंकले होते. आता ते तिसऱ्यांदा लढत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीवेळी अर्थात 2019 साली उमेदवारी अर्ज दाखल करत असताना बारणे यांच्या उमेदवारी अर्जात कुटुंबाची संपत्ती 102 कोटी 81 लाख दाखवली होती. आता मात्र 2024 च्या निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात बारणे यांच्या कुटुंबीयांची एकूण संपत्ती 131 कोटी 85 लाखांवर पोहोचली आहे. अर्थात बारणे यांच्या संपत्तीत पाच वर्षांत 29 कोटी 4 लाखांची वाढ झाली आहे.

महागड्या गाड्या, बंदूक आणि बरंच काही…
श्रीरंग बारणे यांनी दिलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार बारणे यांच्याकडे मर्सिडीझ बेंझ आणि टोयाटो फॉर्च्युनर या दोन महागड्या गाड्या आहेत. तसेच त्यांच्याकडे सोने, हिरे आदी संपत्तीही आहे. बारणे यांच्याकडे मावळ, मुळशी तालुक्यात जमिनी आहेत. तसेच बारणे यांच्यावर तीन गुन्हे दाखल असून 35 हजारांचे एक रिव्हॉल्व्हर (बंदूक) देखील आहे. खास बाब म्हणजे खासदार असतानाच अर्थात मार्च 2022 मध्ये बारणे हे दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे त्यांच्या प्रतित्राज्ञात पत्रात नमूद आहे.

अधिक वाचा –
– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण, महाराष्ट्रातील 5 मान्यवरांचा समावेश । Padma Awards 2024
– जोरदार शक्तिप्रदर्शन करत मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha
– धक्कादायक! पुणे जिल्ह्यात कासारसाई आणि चाकण येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा बुडून मृत्यू । Pune News


Previous Post

संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची संपत्ती! मुलाला 1 कोटी दिले पण स्वतःला गाडी नाही, गुन्हे – पिस्तूल आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Sanjog Waghere Property

Next Post

ईव्हीएमबद्दल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मेसेजबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, ‘तो मेसेज…’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
EVM VVPAT Machine

ईव्हीएमबद्दल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या 'त्या' मेसेजबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो मेसेज...'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.