पुणे जिल्ह्यातील ३४- पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
निवडणूक निरीक्षक म्हणून प्रसाद लोलयेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०६ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३०९३५४९२४ आणि इमेल आयडी loksabhaelectionpune@gmail.com असा आहे. ( Appointment of Election Inspectors for Pune Lok Sabha Elections )
निवडणूक निरीक्षक, पुणे लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे मंगळवार व गुरुवार रोजी १०.३० वाजेपासून सायं १२.३० वाजेपर्यंत भेटता येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही पुणे लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची संपत्ती! मुलाला 1 कोटी दिले पण स्वतःला गाडी नाही, गुन्हे – पिस्तूल आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Sanjog Waghere Property
– ‘श्रीरंग बारणे यांचा पराभव करून मी माझा भाऊ पार्थ पवार याच्या पराभवाचा वचपा काढणार’ – आमदार रोहित पवार । Maval Lok Sabha
– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण, महाराष्ट्रातील 5 मान्यवरांचा समावेश । Padma Awards 2024