लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक 1 मे रोजी रात्री त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. तेव्हा पथकाने रात्री 1 वाजताच्या सुमारास तिथे छापा टाकला. टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव शहरातील केशवनगर भागात एका खोलीमध्ये 1) दिब्यांशू श्रीमुलचंद धारिया (वय 21 वर्ष, रा. वडगाव मावळ) यांच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा 1 लाख 37 हजार 677 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून नमूद आरोपीचा साथीदार तनविर शेख (रा. वडगाव मावळ) हा पोलिसांची चाहूल लागताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. ( Action by IPS Satyasai Karthik team against Gutkha seller at Vadgaon Maval )
सदरचा मुद्देमाल जप्त करून वर नमूद दोन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 328,272,273,34 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोलिस हवालदार अंकुश नायकुडे, पोलिस हवालदार नितेश कवडे, पोलिस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक वाचा –
– श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मावळ भाजपाची बुथ कमिटी सज्ज! मतदारांशी घरोघरी जाऊन साधणार संवाद । Maval News
– वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण । Vadgaon Maval
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कारचा भीषण अपघात, देवदर्शनावरून परत येत असलेल्या बर्वे कुटुंबावर काळाचा घाला । Accident On Mumbai Pune Expressway