धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने संस्कारशाळा आश्रम दहिवली-कार्ला या ठिकाणी घेण्यात आलेल्या सामुदायिक विवाहसोहळ्यात मावळ तालुक्यातील दहा परिवारातील पाच वधू वरांचा शुभविवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष असून सामुदायिक विवाह सोहळ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दुपारी बारा वाजता हळदी समारंभ, त त्यानंतर भोजन व सायंकाळी 5 वा 5 मी वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या नववधूला सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले, नथनी, पैंजण ,जोडवी व मनगटी घड्याळ दिले. तसेच साखरपुड्याची साडी व लग्नाचा शालू, संसार उपयोगी वस्तू देखील आयोजकांकडून देण्यात आले. वधू वरांना साखरपुड्याचा व लग्नाचा पोशाख, मनगटी घड्याळ देखील देण्यात आले. सोबतच बँड पथक वाजंत्री रथ यांंच्या गजराने वरराज्याची मिरवणूक काढण्यात आली. भोजन व्यवस्था मुरारीलाल शर्मा यांंच्या वतीने करण्यात आली होती. ( 5 couples got married in a community wedding ceremony at Dahivali Karla )
यावेळी श्रीरंग बारणे,बापुसाहेब भेगडे,गणेश भेगडे,भाऊसाहेब गुंड,दिपक हुलावळे,संदीप वाघिरे ,रविंद्र भेगडे,गणपत भानुसघरे ,मिलिंद बोत्रे ,बाळासाहेब भानुसघरे,सुरेश गायकवाड ,जितेंद्र बोत्रे,निखिल कविश्वर,कैलास गायकवाड,लक्ष्मण बालगुडे,मधुकर पडवळ,बाळासाहेब भानुदास,बबनराव माने,सचिन येवले,दत्तात्रय पडवळ,प्रदिप हुलावळे,बाळासाहेब आंबेकर,काळुराम थोरवे,अनिल मालपोटे,विठ्ठल वाघमारे,सुभाष भानुसघरे,बाळासाहेब मावकर,शांताराम मावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या विवाहसोहळ्याचे आयोजन सोहळा समितीचे अध्यक्ष अमोल भेगडे,मानद अध्यक्ष सचिन भानुसघरे , कार्याअध्यक्ष मनोज येवले संस्थापक माजी सभापती शरद हुलावळे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे, चंद्रकांत शेलार, संतोष केदारी, संदीप तिकोणे,सदस्य भाऊसाहेब हुलावळे,सुनिल गरुड,अशोक पडवळ, मुरारीलाल शर्मा,मच्छिंद्र केदारी मंगेश हुलावळे, मारुती येवले, नितिन वाडेकर, विशाल जमदाडे, सीमा आहेर, दिलीप खेंगरे, एकनाथ गायकवाड, सिमा बालगुडे, संगीता केदारी, सोमनाथ सावंत, भाऊसाहेब मापारी, संदिप भानुसघरे, शंकर पडवळ, नवनाथ कोंडभर, सुनिल गायकवाड, नितिन देशमुख, खंडु शेलार, बाबाजी सोंडेकर, राम येवले, सतीश मोरे, शांताराम ढाकोळ, किसन येवले, भगवान देशमुख, शेखर दळवी, खंडु आहेर, बबन गरुड,उल्हास दळवी यांच्यावतीने करण्यात आले होते. प्रस्ताविक शरद हुलावळे,सचिन भानुसघरे व अमोल भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे, सदिप तिकोणे,शंकर पडवळ,मच्छिंद्र केदारी यांनी केले.
अधिक वाचा –
– थंडगार पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, तळेगावजवळ कुंडमळा येथे दोन मुलांचा बुडून मृत्यू । Maval News
– काले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगिता मोहोळ बिनविरोध । Pavananagar News
– श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मावळ भाजपाची बुथ कमिटी सज्ज! मतदारांशी घरोघरी जाऊन साधणार संवाद । Maval News