टीळा अर्थात कुंकूमतिलक समारंभ झाल्यानंतर होणाऱ्या पतीचे प्रेमसंबंध उघडकीस आल्याने आपले आयुष्य बरबाद होणार, या भीतीने तरुणीने आत्म’हत्या केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून संबंधित तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गुरुवारी (दि. 2 मे) रोजी हा प्रकार उघडकीस आला. तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्म’हत्या केली. या प्रकरणी मृत तरुणीच्या भावाने फिर्याद दाखल केल्यानंतर फिर्यादीवरून 30 वर्षीय तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( girl committed suicide after realizing that her future husband was having an affair )
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचे सदर तरूणाशी लग्न ठरले होते. त्यांचा गेल्याच महिन्यात टिळा अर्थात कुंकूम तिलकाचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा किंवा त्यापूर्वी संबंधित तरुणाने मुलीला किंवा तिच्या घरच्यांना याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतू नंतर लग्न करायचे नाही असे त्याने सांगितले. त्यामुळे फिर्यादीच्या बहिणीने वाईट वाटून घेत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमुद आहे.
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात भरारी पथकाद्वारे अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे, गावठी दारूचे रसायन आणि मुद्देमाल जप्त । Pune News
– मोठी बातमी! ‘पाणी जपून वापरा, पाणी आल्यावर साठा करून ठेवा’, लोणावळा नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन । Lonavala News
– खबरदार ! ‘डीप फेक’ फोटो, व्हिडिओ बनवाल किंवा प्रसारित कराल तर होईल कडक सजा, पोलिसांना मिळालेत थेट आदेश