मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता सभा, रॅल्या, बैठका यांचा जोर दिसून येणार आहे. महायुतीकडून याची सुरुवात झाल्याचेही दिवस आहे. रविवारी (दि. 5 मे) प्रख्यात अभिनेता गोविंदा अहुजा याने शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी प्रचार रॅली काढली. परंतू या रॅलीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र जे काही घडलं त्याची चर्चा आता देशस्तरावर होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रविवारी (दि. 5 मे) रोजी संध्याकाळी लोकप्रिय हिंदी अभिनेता गोविंदा याच्या हस्ते महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागे हे निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभानंतर पिंपरी कॅम्प आणि पिंपरीगाव भागात गोविंदा याचा रोड शो झाला. तदनंतर गोविंदा आणि श्रीरंग बारणे आणि अन्य मान्यवर नेते यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना गोविंदा उमेदवार श्रीरंग बारणे यांचे नाव विसरल्याचे दिसून आले. ( lok sabha elections 2024 campaigner actor govinda forgot name of maval candidate shrirang barne )
नेमके काय घडले?
झालं असं की, गोविंदाच्या उपस्थितीत एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत गोविंदा श्रीरंग बारणे यांनी केलेल्या कामांचा गौरव करणार हे ठरलेले होते. मुळात गोविंदा सारखा स्टार प्रचारक त्यासाठीच बोलावला होता, हे काही वेगळे सांगायला नको. परंतू मुंबईहून एवढ्या दूर मावळात गोविंदा ज्यांच्यासाठी आला होता, त्यांचे नावही त्याला ठावूक नव्हते किंवा तो विसरला, हे सर्वांच्या लक्षात आले. कारण पत्रकार परिषदेत गोविंदा जेव्हा बोलू लागला, तेव्हा सुरुवातीला त्याने फक्त ‘आदरणीय’ एवढाच शब्द उच्चारला. आपण ज्या उमेदवारासाठी आलोय, त्याचे नाव आपल्याला लक्षात नसल्याचे गोविंदाच्या ध्यानी आले आणि त्याने तेव्हा शेजारी बसलेल्या आमदार उमा खापरे यांना उमेदवाराचे नाव विचारले, त्यानंतर उमा खापरे यांनी गोविंदाला ती माहिती दिली. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
अधिक वाचा –
– ‘मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची राहिल’ – आमदार सुनिल शेळके
– म्हाळूंगे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात गावठी दारूसह 2 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त । Pune Crime
– पुणे जिल्ह्यात भरारी पथकाद्वारे अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे, गावठी दारूचे रसायन आणि मुद्देमाल जप्त । Pune News