लोकसभा निवडणूकांतील चौथ्या टप्प्यातील मतदारसंघातील प्रचार आता ऐन रंगात आला आहे. अवघे काही दिवस हाती राहिल्याने अखेरच्या टप्प्यात मतदारसंघात प्रमुख नेत्यांच्या सभांचा धुरळा उडाला आहे. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या नंतर आता मावळ लोकसभेत राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रचाराची तोफ धडाडणार असून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी ते प्रचार करणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अजित पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघात आज (दि. 9 मे) दोन सभा होणार आहेत. यातील पहिली सभा ही मावळ विधानसभा मतदारसंघात कामशेत येथे होणार आहे. तर दुसरी सभा ही पिंपरी विधानसभा मतदारसंघात पिंपरी येथे होणार आहे. या दोन्ही विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार असून येथे राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. त्यामुळे अजितदादांच्या सभांचा बारणेंना मोठा फायदा होईल, हे निश्चित. ( Maval Lok Sabha Constituency Ajit Pawar Rally for campaign of Mahayuti candidate Shrirang Barne )
श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ राज्याचे अजित पवार यांची मावळ लोकसभेतील पहिली जाहिर सभा आज सायंकाळी (गुरुवार, दि.9 मे) 4 वाजता कामशेत येथे होणार आहे. श्री विठ्ठल परिवार मावळ या मैदानावर ही सभा होणार असून महायुतीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य मतदारांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन मावळ चे आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे. तसेच अजित पवार यांच्या सभांबाबत आमदार सुनिल शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे आणि मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी अधिक माहिती दिली.
अधिक वाचा –
– खर्चात तफावत आढळल्याने श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस ! Maval Lok Sabha
– दुर्दैवी ! गावी आलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू, शिरगाव-कासारसाई रस्त्यावरील घटना, अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा
– आंबी येथे पोलिसांच्या छाप्यात 5000 लीटर गावठी दारूचे रसायन जप्त, एकावर गुन्हा दाखल । Maval Crime