व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुर्दैवी ! गावी आलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू, शिरगाव-कासारसाई रस्त्यावरील घटना, अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा

कासारसाई ते शिरगाव रस्त्यावर एका भरधाव दुचाकी चालकाने दिलेल्या धडकेत 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 7, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Accident

File Photo : Accident Image


कासारसाई ते शिरगाव रस्त्यावर एका भरधाव दुचाकी चालकाने दिलेल्या धडकेत 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालक आरोपीविरोधात शिरगाव पोलिसांत भा.द.वि. कलम 304 (अ), 337, 338, 279 आणि मो.वा. अँ. 148, 177, 134 (1)(2) अन्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रविवारी सायंकाळी पाऊणे सहाच्या वाजताच्या दरम्यान मौजे दारूंब्रे गावच्या हद्दीत नानाचा ढाबा हॉटेलजवळ शिरगाव ते कासारसाई रस्त्यावर हा अपघात घडला. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) कन्हैया मारुती सोरटे (वय 30 वर्षे, रा. दारूंब्रे ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. अपघातात हिराबाई साहेबराव मोरे (वय 70) या महिलेचा मृत्यू झाला आहे. ( Woman dies in two-wheeler accident case registered in Shirgaon police Maval Crime )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारिख आणि वेळेला फिर्यादी कन्हैया सोरटे यांची आत्या हिराबाई साहेबराव मोरे (वय 70 वर्षे सध्या रा. दारुंब्रे ता. मावळ) या कासारसाई कारखान्यापासून दारुंब्रे दिशेने पायी चालत जात होत्या. तेव्हा एका अज्ञात मोटार सायकल स्वाराने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल कासारसाई कारखान्याकडून दारूंब्रे गावाच्या दिशेने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून हिराबाई मोरे यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात हिराबाई साहेबराव मोरे ह्या गंभीर जखमी होऊन मृत पावल्या. त्यावेळी अपघातास कारणीभूत दुचाकीस्वार घटनास्थळी न थांबता तिथून पळून गेला, असे फिर्यादीत नमुद आहे. पोलिस हवालदार धायगुडे हे पुढील तपास करत आहे.

अधिक वाचा –
– ‘पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना निवडणूकीतून धडा शिकवा’, संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी वरुण सरदेसाई यांची मशाल यात्रा
– ‘काँग्रेसच्या राजवटीत 100 पाठवले की 15 मिळायचे आता थेट पैसे खात्यात येतात’, लोणावळ्यात चित्रा वाघ यांच्याकडून बारणेंचा प्रचार
– मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद ठेवण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

आंबी येथे पोलिसांच्या छाप्यात 5000 लीटर गावठी दारूचे रसायन जप्त, एकावर गुन्हा दाखल । Maval Crime

Next Post

“मावळच्या विकासासाठी संजोग वाघेरे यांच्याशिवाय पर्याय नाही”, वाचा कोणी म्हटलंय असं… । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog-Waghere

"मावळच्या विकासासाठी संजोग वाघेरे यांच्याशिवाय पर्याय नाही", वाचा कोणी म्हटलंय असं... । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.