व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद ठेवण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune News

पुणे जिल्ह्यात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघात व मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 6, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Illegal-Liquor

File Image


पुणे जिल्ह्यात होत असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका खुल्या, मुक्त, शांतता, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात होण्याच्यादृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिनांकास निर्धारित केलेल्या वेळेच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमित केले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे जिल्ह्यात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघात व मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व मद्य विक्रीच्या, ताडी विक्रीच्या व इतर संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याअन्वये बारामती लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तसेच मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघात 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 13 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तसेच 4 जून रोजी संपूर्ण दिवसासाठी हे आदेश लागू राहतील. ( Order of Pune District Collector to stop sale of liquor in view of Lok Sabha elections read in details )

निवडणूक निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन निर्माणी अनुज्ञप्तीधारक बंदच्या कालावधीत उत्पादन करु शकतील. परंतु या कालावधीत कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. तसेच ठोक मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींनी कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना मद्याचा पुरवठा करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम 1949 व त्याअंतर्गत लोकप्रतिनिधीत्व अधिनियमन 1951 अंतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– वाघेरेंची ताकद दुपटीने वाढली, मराठा समाजाकडून मावळ लोकसभेत संजोग वाघेरेंना पाठींबा जाहीर ! वाघेरेंनीही दिले ‘वचन’
– मावळ लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक आणि मतदान कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर
– गोविंदा आला.. गोविंदा आला.. पण ज्यांच्यासाठी आला त्यांचे नावच विसरला ! ‘आदरणीय’ बोलून विषय संपवला । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

Maval Lok Sabha : मावळमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूतीची सुप्त लाट ? संजोग वाघेरेंना होणार फायदा… । विशेष लेख

Next Post

‘काँग्रेसच्या राजवटीत 100 पाठवले की 15 मिळायचे आता थेट पैसे खात्यात येतात’, लोणावळ्यात चित्रा वाघ यांच्याकडून बारणेंचा प्रचार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chitra Wagh at lonavala

'काँग्रेसच्या राजवटीत 100 पाठवले की 15 मिळायचे आता थेट पैसे खात्यात येतात', लोणावळ्यात चित्रा वाघ यांच्याकडून बारणेंचा प्रचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.