व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वाघेरेंची ताकद दुपटीने वाढली, मराठा समाजाकडून मावळ लोकसभेत संजोग वाघेरेंना पाठींबा जाहीर ! वाघेरेंनीही दिले ‘वचन’

सकल मराठा समाजाच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 6, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Maratha Samaj Support to Sanjog Waghere

Photo Courtesy : Team Dainik Maval


सकल मराठा समाजाच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला आहे. खोपोली येथे 4 मे रोजी सकाळी पार पडलेल्या बैठकीमध्ये उपस्थित सकल मराठा समजाच्या सर्व समन्वयकांच्या वतीने हा एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण मराठा समाज संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करेल, असा विश्वास या बैठकीमध्ये संजोग वाघेरे यांना देण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

संजोग वाघेरे यांनी लोकसभेमध्ये पहिला मुद्दा हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मांडला जाईल असे आश्वासन सकल मराठा समाजाला दिले. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सातत्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरला जाईल, असा शब्द देखील त्यांनी समाजाला दिला आहे. ( Maval Lok Sabha Election Maratha Samaj Declared Support to Sanjog Waghere Patil )

मनोज जरांगे पाटील यांनी, लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची ताकद दाखवा आणि ज्यांनी आपल्या गुलालाचा अपमान केला, ज्यांच्यामुळे माय भगिनींचे रक्‍त सांडले, त्यांना दणकून पाडा, असे सांगितले होते. जरांगेंच्या या सूचनांनंतर सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक 3 मे रोजी खोपोली येथे झाली. त्या बैठकीत कर्जत, खालापूर, खोपोली, पनवेल, उरण येथील सकल मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते. जवळपास 2 तास बैठक सुरु होती.

मावळ लोकसभेसाठी 33 उमेदवार असेल तरीही, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात थेट लढत होणार असल्याने सकल मराठा समाजाने संजोग वाघेरे पाटील यांनाच मतदान करू, असे सर्वांनी एकमताने ठरवले. परंतू वाघेरे पाटीलांची मराठा समाजासंदर्भात भूमिका काय आहे, ते जाणून घेण्यासाठी पुन्हा 4 मे रोजी सकाळी 9 वाजता सकल मराठा समाज रायगड (मावळ मतदार संघ) यांची बैठक खोपोली येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीला उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे आले. तेव्हा सकल मराठा समाज समन्वयकांनी त्यांना बैठकीत, आपली मराठा समाजासंदर्भात भूमिका काय आहे, अशी विचारणा केली.

त्यावर वाघेरे यांनी, ‘मी पहिल्यापासून मराठा आंदोलनात एक कार्यकर्ता म्हणून सहभागी आहे. मी निवडून आल्यानंतर संसदेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडेल. आरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करीन. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत शांत बसणार नाही. मी नेहमी मराठा समाजासोबत राहीन,’ असा शब्द मराठा समाजाला दिला. तेव्हा उपस्थित सर्व मराठा समाज बांधवानी एकमताने संजोग वाघेरे पाटील यांना एकमुखी पाठिंबा दिला.

सदर बैठकीला सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. सुनील पाटील, विनोद साबळे, रायगड जिल्हा समन्वयक शंकर थोरवे, गणेश कडू, उमेश महसे, प्रकाश पालकर, अनिल भोसले, मारुती पाटील, धनश्री दिवाणे, किरण हाडप, उत्तम भोईर, जे.पी. पाटील, भानुदास पालकर, सुरेश बोराडे, नितीन मोरे, अविनाश तावडे, दीपक लाड, एकनाथ पिंगळे, राजन सुर्वे, अविनाश तावडे, मनोहर देशमुख यांच्यासह सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

अधिक वाचा –
– मावळ लोकसभेत महायुतीत खदखद, त्यामुळे थेट दिल्लीतून आलंय पथक ? पाहा काय झालं या पथकाचं… । Maval Lok Sabha
– टिळा झाल्यावर होणाऱ्या नवऱ्याचे प्रेमसंबंध उघडकीस आल्याने तरूणीची आत्म’हत्या, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! Maval Crime
– ‘मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची राहिल’ – आमदार सुनिल शेळके


Previous Post

मावळ लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक आणि मतदान कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर

Next Post

मे अखेरपर्यंत इंद्रायणी नदीवरील पूल बांधून पूर्ण न झाल्यास मोठे जनआंंदोलन करण्याचा इशारा ! जाणून घ्या सविस्तर । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bridge over Indrayani River

मे अखेरपर्यंत इंद्रायणी नदीवरील पूल बांधून पूर्ण न झाल्यास मोठे जनआंंदोलन करण्याचा इशारा ! जाणून घ्या सविस्तर । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.