व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मे अखेरपर्यंत इंद्रायणी नदीवरील पूल बांधून पूर्ण न झाल्यास मोठे जनआंंदोलन करण्याचा इशारा ! जाणून घ्या सविस्तर । Maval News

कार्ला मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 6, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Bridge over Indrayani River

Photo Courtesy : Team Dainik Maval


कार्ला ते मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून सदर पुलाचे काम 31 मे पर्यंत पूर्ण न झाल्यास मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा एकविरा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास परिसरातील गावांना त्याचा फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

नव्यानेच पर्यटन क्षेत्र म्हणून मळवली परिसर विकसित होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात बंगले भाड्याने दिले जात आहेत. या परिसरात जगप्रसिद्ध भाजे लेणी, तसेच लोहगड आणि विसापूर हे किल्ले असून मोठ्या प्रमाणात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक या परिसरामध्ये येत असतात. पुलाचे काम पूर्ण न झाल्यास येणाऱ्या पर्यटकांना व कार्ला मळवली परिसरातील पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच 25 गावांचा संपर्क तुटणार असल्याने या भागातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, दुग्ध व्यवसायिक या सर्वांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. ( Bridge over Indrayani River between Karla and Malvali is incomplete )

त्या शिवाय नदीपात्रात पुलाचे काम सुरू आहे. त्याकरिता शेजारून तात्पुरत्या स्वरूपामध्ये मातीचा भराव करून रस्ता बनवण्यात आला आहे. नदीपात्रात काम करताना जे मातीचे उत्खनन करण्यात आले आहे, ती माती देखील पात्रात पडून आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी मातीचा हा राडाराडा बाजूला न केल्यास या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पूराचे पाणी आजूबाजूच्या भात शेतीमध्ये पसरून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अशाप्रकारचे नुकसान टाळण्यासाठी व या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय व पर्यटन व्यवसायावर येणारी गदा रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिवस रात्र एक करत सदरचे काम 31 मे पर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी एकविरा कृती समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.

या बाबतचे निवेदन वडगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता दराडे साहेब यांच्या कार्यालयात जाऊन एकविरा कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत मोरे, नंदकुमार पदमुले, गुलाब तिकोणे, विजय तिकोणे, उस्मान इनामदार, अमित ओव्हाळ, नवनाथ कडु, रोहिदास हुलावळे, विकास वाल्हेकर व एकवीरा कृती समितीचे सदस्य व कार्ला, मळवली परिसरातील ग्रामस्थ यांनी दिले आहे.

अधिक वाचा –
– गोविंदा आला.. गोविंदा आला.. पण ज्यांच्यासाठी आला त्यांचे नावच विसरला ! ‘आदरणीय’ बोलून विषय संपवला । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभेत महायुतीत खदखद, त्यामुळे थेट दिल्लीतून आलंय पथक ? पाहा काय झालं या पथकाचं… । Maval Lok Sabha
– टिळा झाल्यावर होणाऱ्या नवऱ्याचे प्रेमसंबंध उघडकीस आल्याने तरूणीची आत्म’हत्या, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! Maval Crime

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

वाघेरेंची ताकद दुपटीने वाढली, मराठा समाजाकडून मावळ लोकसभेत संजोग वाघेरेंना पाठींबा जाहीर ! वाघेरेंनीही दिले ‘वचन’

Next Post

Maval Lok Sabha : मावळमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूतीची सुप्त लाट ? संजोग वाघेरेंना होणार फायदा… । विशेष लेख

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Uddhav Thackeray Sanjog Waghere

Maval Lok Sabha : मावळमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूतीची सुप्त लाट ? संजोग वाघेरेंना होणार फायदा... । विशेष लेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.