Accident On Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज (दि. 10) पहाटे हा अपघात झाला. तीन वाहनांच्या या अपघातात 3 जण ठार झालेत, तर 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. खोपोली शहराजवळ हा अपघात झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
असा घडला अपघात –
आज, शुक्रवारी (दि. 10 मे) पहाटे 4 वाजताचे सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील किलोमीटर 38:200 दरम्यान मुंबई लेनवर भीषण अपघात घडला. ट्रक क्र. KA-56 – 3277 वरील चालक बालाजी वडर (वय 26) याच्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याचे ट्रक वरील नियंत्रण सुटून पुढे चालणाऱ्या कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पो क्रमांक MH-03-CP- 2428 आणि ओमनी क्र. MH -11- Y- 7832 या वाहनांना ट्रकची जोरात धडक बसली.
अपघातात 3 ठार –
अपघातात ओमनी कार मधील चालकासह 5 व्यक्ती पैकी 2 जण मयत असून त्यात 1 महिला, 1 पुरूष यांचा समावेश आहे. तर 2 जण गंभीर जखमी तर चालक किरकोळ जखमी आहे. कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पो मधील चालकासह 4 जणांपैकी 2 गंभीर तर 2 जण किरकोळ जखमी आहेत. ट्रक मधील चालकासह 3 इसमापैकी 1 मयत व 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ( Fatal accident involving car tempo truck near Khopoli on Mumbai Pune Expressway 3 Death )
जखमींना उपचारासाठी एमजीएम हाॅस्पिटल पनवेल आणि खोपोली नगरपालिका रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. 3 मयतांची शव पुढील कार्यवाहीसाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात नेण्यात आली आहेत. अपघात ठिकाणी मदतीसाठी आयआरबी कडील देवदूत टीम, आयआरबी पेट्रोलिंग टीम, मृत्युंजय दूत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटल ॲम्बुलन्स सेवा, महाराष्ट्र शासनाची 108 ॲम्बुलन्स सेवा यांनी मदतकार्य केले.
महामार्ग वाहतूक पोलीस – बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात झाल्यानंतर काही वेळासाठी वाहतूक बाधित झाली होती मात्र तात्काळ मदतकार्य पूर्ण करून वाहतूक खुली करण्यात आली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सर्वच यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधत केलेल्या संयुक्त प्रयत्नातून मोठी जीवित हानी टळली. तातडीने मदत कार्य करून बाधित वाहने बाजूला घेतल्याने वाहतूक जास्त वेळ खोळंबली नाही. मृत आणि जखमी व्यक्तींच्या नातेवाईकांशी संपर्क झालेला आहे. एमजीएम रुग्णालय येथे सर्वच पेशंट शिफ्ट केले असून आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.
अधिक वाचा –
– मतदान वाढीसाठी सहकार विभागाचे विशेष प्रयत्न, येत्या 13 मे रोजी मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभेसाठी होणार मतदान
– शिरूर, मावळ, पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदार चिठ्ठी वितरणाचा समन्वय अधिकाऱ्यांकडून आढावा । Pune News
– बोटीसह 525 वाहने आणि 12 हजार अधिकारी-कर्मचारी; मावळ लोकसभेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज !