पवनानगर ( Pavananagar ) येथील साम्राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊ दत्तू मोरे ( Bhau More ) (वय 36) यांचे दुःखद निधन झाले आहे. भीषण अपघातानंतर तब्बल 12 दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, मात्र अखेर काल ( सोमवार, 7 नोव्हेंबर) रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या मित्रपरिवारावर आणि ग्रामस्थावंर मोठी शोककळा पसरली आहे. ( Pavananagar Samrajya Group Founder Leader Bhau More Passed Away )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भाऊ मोरे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे आणि मदतगार म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. त्यांचा कृषी पर्यटनाचा व्यवसाय होता. मात्र, पैलवान असलेले भाऊ मोरे यांनी साम्राज्य ग्रुपच्या माध्यमातून मोठी ताकद निर्माण केली होती.
काही दिवसांपूर्वी येळसे गावच्या शेवती वसाहतजवळ त्यांचा अपघात झाला होता. जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा गंभीर अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर पवना हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. मात्र, 12 दिवस मृत्यूशी लढा दिल्यानंतर अखेर सोमवारी त्यांचे प्राणपाखरु उडाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माऊली आढाव यांचे ते भाचे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि बाकी परिवार आहे. पवनानगर येथे आज (मंगळवार, 8 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी पवना नदी काठी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अधिक वाचा –
– पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतचा अंतिम अहवाल 15 दिवसांत सादर करावा – आमदार सुनिल शेळके
– भयंकर! रेल्वे ट्रॅकवर युवकाचा मृत्यू, रेल्वे अंगावरुन गेल्याने शरीराच्या अक्षरशः ठिकऱ्या