कृषी व शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेतीबाबत विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे यशदा येथे 16 मे रोजी सकाळी 9.30 ते संध्या. 6 या वेळेत आयोजन करण्यात आल्याची माहिती कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांनी दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्यशाळेला भारत सरकारच्या कृषी विभागातील सह सचिव (आयएनएम), देशाच्या पश्चिम भागातील राज्यांचे कृषी सचिव, आयुक्त, संचालक, आयसीएआरचे शास्त्रज्ञ, चार कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, केंद्रिय कृषी मंत्रालयातील अधिकारी, निवडक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. ( Organized one day workshop on Science and Natural Farming at Yashda Pune News )
या कार्यशाळेत नैसर्गिक शेतीबाबतचे धोरण आणि त्याअनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत चर्चा होणार असून यात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, गोवा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण व दिव आणि लक्षद्वीप या 8 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 250 शास्त्रज्ञ, अधिकारी व शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना कला गौरव पुरस्कार
– घाटकोपर होर्डींग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर, आज आणखीन 2 मृतदेह सापडले, शासनाकडून ‘इतकी’ मदत जाहीर ! Ghatkopar Hoarding Collapse
– मोदींचा सत्कार करताना जिरेटोप भेट, ‘छत्रपतींचा जिरेटोप चढवला आता सिंहासनावरही बसवणार का?’, महाराष्ट्रात संतापाची लाट – Video