व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोदींचा सत्कार करताना जिरेटोप भेट, ‘छत्रपतींचा जिरेटोप चढवला आता सिंहासनावरही बसवणार का?’, महाराष्ट्रात संतापाची लाट – Video

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशी घट्ट असलेल्या जिरेटोप विषयी काही संकेतही आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मर्जी राखण्यासाठी त्यांना जिरेटोप घातल्याबद्दल शिवभक्तांमधून प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 15, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Controversy Over Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On PM Narendra Modi

Photo Courtesy : Team Dainik Maval


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 14 मे) वाराणसीतून तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार केला. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन आता टीका केली जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशी घट्ट असलेल्या जिरेटोप विषयी काही संकेतही आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मर्जी राखण्यासाठी त्यांना जिरेटोप घातल्याबद्दल शिवभक्तांमधून प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 14 मे) वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांचे प्रमुख नेते तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल पटेल उपस्थित होते. मोदींनी अर्ज दाखल केल्यानंतर सर्व नेत्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला. हा व्हिडिओ सोशलवर व्हायरल होताच त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ( Controversy Over Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On PM Narendra Modi NCP Praful Patel )

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही जिरेटोप परिधान करू नये, असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यानंतर जिरेटोप परिधान करण्याचा प्रघात आहे. पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत. केवळ छत्रपती हा जिरेटोप परिधान करू शकतात. जिरेटोपाचा अवमान करण्यात येऊ नये,’ असा इशारा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी दिला आहे.

अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आता याप्रकरणी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालण्याचं प्रफुल्ल पटेल यांचं धाडस कसं झालं. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का? असा संतप्त सवाल आनंद दवे यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘आपण काय करत आहोत, हे प्रत्येकाला कळायला हवे’ अशी प्रतिक्रिया दिली. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी मात्र याविषयी सारवासारव केली आहे. ‘जिरेटोपावरून राजकारण करू नये, ज्यांनी जिरेटोप घातला त्या पंतप्रधानांचा यात काय दोष?’, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले. तर ‘प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप घातला त्यात मोदींचा काय दोष?’ असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया –

अधिक वाचा –
– शिलाटणे येथे वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांची तारांबळ, कार्ल्यात चारचाकी वाहनाचे झाले नुकसान
– नायगावमधील युवकाचा कामशेत येथे इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, परिसरात पसरली शोककळा । Maval News
– पुणे जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत मतदान ! वाचा विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी । Pune News


Previous Post

मावळ लोकसभेतील ईव्हीएम यंत्रे असलेली बालेवाडीमधील स्ट्राँग रूम ‘सील’, पोलिसांचा 24 तास असणार खडा पाहारा । Maval Lok Sabha

Next Post

घाटकोपर होर्डींग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर, आज आणखीन 2 मृतदेह सापडले, शासनाकडून ‘इतकी’ मदत जाहीर ! Ghatkopar Hoarding Collapse

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ghatkopar Hoarding Collapse

घाटकोपर होर्डींग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर, आज आणखीन 2 मृतदेह सापडले, शासनाकडून 'इतकी' मदत जाहीर ! Ghatkopar Hoarding Collapse

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.