ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मंगळवार (दि. 14 मे) रोजी परंदवडी ते सोमाटणे फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावरील परंदवडी ओव्हरब्रिजवर हा अपघात घडला आहे. याप्रकरणी शकूर मुबारक शेख (वय 36 रा तळेगाव दाभाडे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीवरून पोलिसांनी टाटा ट्रक के ए 27 ए 4604 यावरील चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात रियाज अहमद मुख्तार कुरेशी (वय 44 रा. मामुर्डी) यांचा मृत्यू झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज कुरेशी हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी घेऊन घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने वेगात येवून त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रियाज कुरेशी खाली कोसळले व त्यांना गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला. शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ( parandawadi accident two wheeler driver killed in collision with truck )
अधिक वाचा –
– पुणे विभागीय भरारी पथकाकडून परदेशी बनावटीच्या मद्यासह 11 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त । Pune Crime
– शनिवारी आणि रविवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा, नाहीतर मनस्ताप होईल
– ‘खासदार आम जनतेचा’ .. ‘विजय निश्चित’ .. ‘घासून नाय ठासून..’ मावळ लोकसभेत निकालाआधीच झळकले संजोग वाघेरे यांच्या विजयाचे बॅनर