व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘खासदार आम जनतेचा’ .. ‘विजय निश्चित’ .. ‘घासून नाय ठासून..’ मावळ लोकसभेत निकालाआधीच झळकले संजोग वाघेरे यांच्या विजयाचे बॅनर

मावळ लोकसभेत यंदा कडवी लढत पाहायला मिळाली. शिवसेना पक्षातील फुटीनंतरचे दोन्ही गट मावळ लोकसभेत एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 17, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Banners of Sanjog Waghere victory

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूकीच्या एकूण 7 टप्प्यांपैकी तीन टप्प्यांचे मतदान अद्याप बाकी आहे. 4 टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व जागांचे निकाल हे 4 जून रोजीच्या मतमोजणीनंतर जाहीर होतील. मावळ लोकसभेत दिनांक 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडले, आणि आता सर्व मतदारांना 4 जून रोजी काय निकाल लागणार, याकडे लक्ष लागलेले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मावळ लोकसभेत यंदा कडवी लढत पाहायला मिळाली. शिवसेना पक्षातील फुटीनंतरचे दोन्ही गट मावळ लोकसभेत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून तथा महायुतीकडून श्रीरंग बारणे आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तथा महाविकासआघाडीच्या वतीने संजोग वाघेरे पाटील हे रिंगणात होते. दोन्ही उमेदवारांनी तोडीसतोड तोड प्रचार मतदारसंघात केला होता. त्यामुळे अंतिमतः निकाल काय लागेल, याबद्दल उत्सूकता वाढली आहे.

मात्र निकाल जरी 4 जून रोजी असला तरीही निकालाआधीच मावळ लोकसभेत एका उमेदवाराचे विजयाचे बॅनर झळकले आहेत. महाविकासआघाडीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात जागोजागी संजोग वाघेरे यांच्या विजयाचे आणि त्यांना खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल शुभेच्छा देणारे बॅनर झळकावले आहेत.

मावळ विधानसभा क्षेत्रातील देहूगाव, माळीनगर परिसरात संजोग वाघेरे यांच्या समर्थकांनी ‘खासदार’ असा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत. ‘खासदार आमच्या जनतेचा देहूनगरीत मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती विजय निश्चित.. घासून नाही ठासून हाणली… संजोग वाघेरे यांचे प्रचंड बहुमतांनी खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..’ असे मजकूर असलेले बॅनर लावण्यात आलेत.

काही दिवसांपूर्वी खुद्द संजोग वाघेरे यांनीही पाऊणेदोन लाखाच्या फरकाने विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर आता ह्या बॅनरबाजीमुळे महायुतीच्या गोटात वातावरण जरा चिंतेचे बनले आहे. ( Banners of Sanjog Waghere victory have been put up in Maval Lok Sabha constituency )

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– 9890099009 – मावळवासियांनो हा नंबर सेव्ह करा ! तुमच्या इथे पाण्याची समस्या असेल तर थेट आमदार सुनिल शेळकेंना करा फोन
– नागरिकांनो घराबाहेर बिलकूल पडू नका ! वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह कोसळतोय अवकाळी पाऊस । Maval News
– डेंग्यूला स्वतःपासून आणि कुटुंबापासून दूर हटविण्यासाठी ‘या’ उपाययोजना करा – आरोग्य विभागाचे आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

सीबीएसई बोर्ड परीक्षेत तळेगावमधील मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल ! सार्थक भांडवलकर प्रथम

Next Post

शनिवारी आणि रविवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा, नाहीतर मनस्ताप होईल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mumbai-pune-expressway

शनिवारी आणि रविवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर 'ही' बातमी नक्की वाचा, नाहीतर मनस्ताप होईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.