पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला पुणे रिंग रोड प्रकल्प येत्या काही वर्षात नजरेस पडेल, अशा दृष्टीने प्रशासनाची पाऊले पडत आहेत. भूसंपदान प्रक्रिया एकीकडे पूर्णत्वास जात असताना, दुसरीकडे रिंग रोड बांधणीतील रस्ते निर्मितीसाठी निविदांची प्रक्रिया सुरु आहे. 172 किलोमीटर लांब आणि 110 मीटर रुंदीचा हा रिंग रोड प्रकल्प पश्चिम आणि पूर्व अशा दोन भागात विभागला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे रिंगरोड मार्गावर अनेक गावे ही प्रकल्प बाधित आहेत. त्या गावांतील जमीन मालकांना योग्य मोबदला देण्याचं काम सरकारमार्फत होत आहे. त्यासाठी प्रक्रिया निश्चत आहे. पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाचे स्थिती पाहिली तर आतापर्यंत पश्चिम मार्गावरील 34 गावांपैकी 31 गावांमधील जवळपास 644 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झालेले आहे आणि त्या भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना तब्बल 2975 कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. ( Pune Ring Road News Land Acquisition Updates )
कोणत्या तालुक्यात किती गावे प्रकल्प बाधित?
पश्चिम मार्गावर भोर तालुक्यातील 1, हवेली तालुक्यातील 11, मुळशी तालुक्यातील 15 आणि मावळ तालुक्यातील 6 अशी गावे बाधित होणार आहेत. पूर्व मार्गावर मावळ तालुक्यातील 11, खेड तालुक्यातील 12 आणि हवेलीतील 15, पुरंदर तालुक्यातील 5 आणि भोर तालुक्यातील 3 गावे प्रकल्प बाधित होणार आहेत.
खालील गावातील निवाडे जाहीर ;
पुणे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पूर्व मार्गातील महत्वाच्या असल्याने खेड आणि हवेली तालुक्यातील जमिनीच्या संपादनाबाबत निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये हवेली तालुक्यातील मौजे बिवरी, वाडे बोल्हाई या गावांचा समावेश आहे. खेड तालुक्यातील सोळु, निघोजे, मोई, मरकळ, खालुम्ब्रे, कुरुळी, गोळेगाव, केळगाव, चऱ्होली, आळंदी आणि चिंबळी इत्यादी गावांचा समावेश आहे.
आता जाहीर झालेल्या निवाड्यांनुसार यामध्ये भूसंपादनापोटी खेड तालुक्यातील गावांकरिता 476 कोटी 72 लाख रुपये तर हवेली तालुक्यातील गावांकरिता 64 कोटी 29 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत, अशी माहिती मिळत आहे.
अधिक वाचा –
– सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक, विभागांनी शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– तळेगाव दाभाडे : महाराष्ट्राचा मॅग्नेट प्रकल्प फुलशेतीसाठी वरदान – अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार
– दुर्दैवी ! परंदवडी ओव्हरब्रिजवर अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू । Maval Accident News