व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! ‘या’ गावातील निवाडे जाहीर, शेतकऱ्यांना लागली लॉटरी, वाचा सविस्तर । Pune Ring Rode News

पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहरातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला पुणे रिंग रोड प्रकल्प येत्या काही वर्षात नजरेस पडेल, अशा दृष्टीने प्रशासनाची पाऊले पडत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 19, 2024
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Pune-Ring-Road

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला पुणे रिंग रोड प्रकल्प येत्या काही वर्षात नजरेस पडेल, अशा दृष्टीने प्रशासनाची पाऊले पडत आहेत. भूसंपदान प्रक्रिया एकीकडे पूर्णत्वास जात असताना, दुसरीकडे रिंग रोड बांधणीतील रस्ते निर्मितीसाठी निविदांची प्रक्रिया सुरु आहे. 172 किलोमीटर लांब आणि 110 मीटर रुंदीचा हा रिंग रोड प्रकल्प पश्चिम आणि पूर्व अशा दोन भागात विभागला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे रिंगरोड मार्गावर अनेक गावे ही प्रकल्प बाधित आहेत. त्या गावांतील जमीन मालकांना योग्य मोबदला देण्याचं काम सरकारमार्फत होत आहे. त्यासाठी प्रक्रिया निश्चत आहे. पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाचे स्थिती पाहिली तर आतापर्यंत पश्चिम मार्गावरील 34 गावांपैकी 31 गावांमधील जवळपास 644 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झालेले आहे आणि त्या भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना तब्बल 2975 कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. ( Pune Ring Road News Land Acquisition Updates )

कोणत्या तालुक्यात किती गावे प्रकल्प बाधित?
पश्चिम मार्गावर भोर तालुक्यातील 1, हवेली तालुक्यातील 11, मुळशी तालुक्यातील 15 आणि मावळ तालुक्यातील 6 अशी गावे बाधित होणार आहेत. पूर्व मार्गावर मावळ तालुक्यातील 11, खेड तालुक्यातील 12 आणि हवेलीतील 15, पुरंदर तालुक्यातील 5 आणि भोर तालुक्यातील 3 गावे प्रकल्प बाधित होणार आहेत.

खालील गावातील निवाडे जाहीर ;
पुणे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पूर्व मार्गातील महत्वाच्या असल्याने खेड आणि हवेली तालुक्यातील जमिनीच्या संपादनाबाबत निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये हवेली तालुक्यातील मौजे बिवरी, वाडे बोल्हाई या गावांचा समावेश आहे. खेड तालुक्यातील सोळु, निघोजे, मोई, मरकळ, खालुम्ब्रे, कुरुळी, गोळेगाव, केळगाव, चऱ्होली, आळंदी आणि चिंबळी इत्यादी गावांचा समावेश आहे.

आता जाहीर झालेल्या निवाड्यांनुसार यामध्ये भूसंपादनापोटी खेड तालुक्यातील गावांकरिता 476 कोटी 72 लाख रुपये तर हवेली तालुक्यातील गावांकरिता 64 कोटी 29 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत, अशी माहिती मिळत आहे.

अधिक वाचा –
– सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक, विभागांनी शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– तळेगाव दाभाडे : महाराष्ट्राचा मॅग्नेट प्रकल्प फुलशेतीसाठी वरदान – अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार
– दुर्दैवी ! परंदवडी ओव्हरब्रिजवर अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू । Maval Accident News


dainik maval jahirat

Previous Post

लोकसभा निवडणूकीत पीएमपीएमएल प्रशासन मालामाल ! तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा । Pune PMPML

Next Post

सीबीएसई बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर, वडगावमधील ‘रिषिका बाफना’ पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Podar International School Vadgaon Maval

सीबीएसई बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर, वडगावमधील 'रिषिका बाफना' पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.