पवनानगर : वारु – ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब बाजीराव काळे यांची निवड झाली आहे. उपसरपंच उज्वला शिंदे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सरपंच निलम साठे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या वेळी ब्राम्हणोली गावातील बाळासाहेब काळे व वसंत काळे यांचे दोन अर्ज आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी सर्व सदस्यांनी दोघांपैकी एक अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी केली. अन्यथा आम्ही सदस्य मतदान करणार नाही, अशी गळ घातली. तरीदे खील कोणीच माघार घेण्यास तयार नव्हते. त्यानंतर सर्वानुमते चिठ्ठी द्वारे निर्णय करण्यात आला. यावेळी बाळासाहेब काळे यांची चिठ्ठी निघाल्याने निवडणूक अधिकारी सरपंच निलम साठे व खोल्लम यांनी काळे यांची निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी सरपंच निलम साठे,माजी सरपंच हरि निंबळे, शाहिदास निंबळे, सुनिता निंबळे,वृषाली निंबळे,उज्वला शिंदे आदी सदस्य उपस्थित होते. ( NCP Balasaheb Kale Elected as a deputy sarpanch of Varu Bramhanoli Group Gram Panchayat )
बिनविरोध करण्यासाठी दोन्ही गावांतील सर्व पक्षाच्या नेत्यांची व ग्रामस्थांची शिष्टाई –
निवडणूक बिनविरोध होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वारु व ब्राम्हणोली गावातील सर्वांनी एकत्र येऊन बैठक घेतली. निवडणूक बिनविरोध करण्याचे आव्हान केले. तरी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला गेला नाही, त्यानंतर सर्वांनी मिळून चिठ्ठीवर निर्णय जाहीर करावे, असा निर्णय घेण्यात आला व ग्रामस्थांच्या शिष्टाईला यश आले यावेळी.
वारु गावचे माजी सरपंच सुनील निंबळे,माजी चेअरमन माऊली निंबळे,माजी सरपंच मारुती काळे, कोथुर्णे सोसायटीचे चेअरमन गबळू काळे,माजी चेअरमन मधुकर काळे,शहाजी काळे, एकनाथ निंबळे, विठ्ठल निंबळे, पोलिस पाटील तानाजी काळे, संभाजी काळे,शंकर निंबळे,शंकर कडू,श्याम कारके, तुकाराम काळे, रामदास काळे,अनंता काळे ,पोपट शिंदे,शंकर काळे,योगेश काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर मिरवणूक काढत गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी निवडीनंतर बोलताना बाळासाहेब काळे म्हणाले की, सर्वांनी बरोबर घेऊन मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून विकासात्मक कामावर करण्यावर भर दिला जाईल.
अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूकीत पीएमपीएमएल प्रशासन मालामाल ! तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा । Pune PMPML
– घाटकोपर होर्डींग दुर्घटनेनंतर देहू नगरपंचायत प्रशासनाला जाग, 24 तासात अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या सुचना
– सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक, विभागांनी शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश