व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वारु – ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब काळे यांचा चिठ्ठीवर विजय !

वारु - ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब बाजीराव काळे यांची निवड झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 19, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Varu Bramhanoli Group Gram Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवनानगर : वारु – ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब बाजीराव काळे यांची निवड झाली आहे. उपसरपंच उज्वला शिंदे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सरपंच निलम साठे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या वेळी ब्राम्हणोली गावातील बाळासाहेब काळे व वसंत काळे यांचे दोन अर्ज आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी सर्व सदस्यांनी दोघांपैकी एक अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी केली. अन्यथा आम्ही सदस्य मतदान करणार नाही, अशी गळ घातली. तरीदे खील कोणीच माघार घेण्यास तयार नव्हते. त्यानंतर सर्वानुमते चिठ्ठी द्वारे निर्णय करण्यात आला. यावेळी बाळासाहेब काळे यांची चिठ्ठी निघाल्याने निवडणूक अधिकारी सरपंच निलम साठे व खोल्लम यांनी काळे यांची निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी सरपंच निलम साठे,माजी सरपंच हरि निंबळे, शाहिदास निंबळे, सुनिता निंबळे,वृषाली निंबळे,उज्वला शिंदे आदी सदस्य उपस्थित होते. ( NCP Balasaheb Kale Elected as a deputy sarpanch of Varu Bramhanoli Group Gram Panchayat )

बिनविरोध करण्यासाठी दोन्ही गावांतील सर्व पक्षाच्या नेत्यांची व ग्रामस्थांची शिष्टाई –
निवडणूक बिनविरोध होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वारु व ब्राम्हणोली गावातील सर्वांनी एकत्र येऊन बैठक घेतली. निवडणूक बिनविरोध करण्याचे आव्हान केले. तरी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला गेला नाही, त्यानंतर सर्वांनी मिळून चिठ्ठीवर निर्णय जाहीर करावे, असा निर्णय घेण्यात आला व ग्रामस्थांच्या शिष्टाईला यश आले यावेळी.

वारु गावचे माजी सरपंच सुनील निंबळे,माजी चेअरमन माऊली निंबळे,माजी सरपंच मारुती काळे, कोथुर्णे सोसायटीचे चेअरमन गबळू काळे,माजी चेअरमन मधुकर काळे,शहाजी काळे, एकनाथ निंबळे, विठ्ठल निंबळे, पोलिस पाटील तानाजी काळे, संभाजी काळे,शंकर निंबळे,शंकर कडू,श्याम कारके, तुकाराम काळे, रामदास काळे,अनंता काळे ,पोपट शिंदे,शंकर काळे,योगेश काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर मिरवणूक काढत गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी निवडीनंतर बोलताना बाळासाहेब काळे म्हणाले की, सर्वांनी बरोबर घेऊन मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून विकासात्मक कामावर करण्यावर भर दिला जाईल.

अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूकीत पीएमपीएमएल प्रशासन मालामाल ! तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा । Pune PMPML
– घाटकोपर होर्डींग दुर्घटनेनंतर देहू नगरपंचायत प्रशासनाला जाग, 24 तासात अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या सुचना

– सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक, विभागांनी शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे शहर हद्दीतील सर्व होर्डिंग अनधिकृत ? । Talegaon Dabhade

Next Post

दुःखद ! साते गावातील सुलाबाई मोहिते यांचे निधन । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sulabai Mohite passed away Sate village Maval

दुःखद ! साते गावातील सुलाबाई मोहिते यांचे निधन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.