कामशेत पोलिसांनी शनिवारी (दि. 18 मे) रोजी जुगार अड्ड्यावर केलेल्या धडक कारवाईत 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिस हवालदार प्रविण रामचंद्र विरणक (कामशेत पोलीस स्टेशन ता. मावळ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शनिवारी (दिनांक 18 मे) रोजी सायंकाळी सहा वाजता मौजे घोणशेत (ता. मावळ) गावच्या हद्दीत स्मशान भुमीजवळ एका शेताच्या बांधावर झाडाखाली सुरु असलेल्या जुगारावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. त्यावेळी 23,350 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ( Kamshet police raid gambling den case registered against 11 persons )
तसेच 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे,
1) नरेश प्रकाश चोरघे (वय 42 वर्शे रा, घोणशेत ता. मावळ)
2) रामदास राघु लंके (वय 40 वर्षों, रा. राजपुरी ता. मावळ)
3) संपत चिंधु लंके (रा. घोणशेत ता. मावळ)
4) विलास ज्ञानु चोरघे
5) प्रकाश कोंडू चोरघे
6) सोपान चंदु लंके
7) संजय कुका लंके
8) नितीन बाळू शिंगाडे
9) विश्वास जयवंत चोरघे
10) रविंद्र काळू चोरघे
11) संतोष वाघमारे (रा. टाकवे बु ता. मावळ)
यांच्यावर कामशेत पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छापा टाकत असताना पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी क्रमांक 3 ते 10 हे तिथून पळाले. पोलिस हवालदार बनसोडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कामशेत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रविंद्र पाटील यांनी हि माहिती दिली.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहर हद्दीतील सर्व होर्डिंग अनधिकृत ? । Talegaon Dabhade
– सीबीएसई बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर, वडगावमधील ‘रिषिका बाफना’ पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम । Vadgaon Maval
– सीबीएसई बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर, वडगावमधील ‘रिषिका बाफना’ पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम । Vadgaon Maval