अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील गोळवलकर मैदानावर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रख्यात मराठी अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच नाट्य परिषदेचे अनेक मान्यवर आणि मावळचे आमदार सुनिल शेळके यांचीही उपस्थिती होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे (मावळ) यांच्या वतीने वर्धापन दिन सोहळ्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांना अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि मान्यवरांच्या हस्ते ‘कला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व नाट्य परिषदेचे सल्लागार चंद्रकांत भिडे यांना अमृतमहोत्सवानिमित्त जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ( Actress Alka Kubal presents Kala Gaurav Award to Vishakha Subhedar Pandharinath Kamble Talegaon Dabhade )
‘नाटकाशी माझी नाळ प्रचंड प्रमाणात जोडलेली आहे. आपण जे नाटक पाहतो त्यात खूप आनंद आणि समाधान मिळते,’ असे प्रतिपादन यावेळी अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांनी केले. दिनांक 19 मे रोजी हा सोहळा संपन्न झाला. यावेळी मावळ तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– बारावी बोर्ड परीक्षेत करिना देवकर प्रथम, कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा यंदा 94 टक्के निकाल
– काळाचा घाला ! परतीच्या मार्गावर असलेल्या तळेगाव येथील कुटुंबाचा लोणावळ्याजवळ अपघात, कारवर कंटेनर उलटला, दोघांचा मृत्यू
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.73 टक्के, ज्युनियर कॉलेज भोयरे विद्यालयातील वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल