महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Exam 2024 Result) मंगळवारी (दि. 21 मे) जाहीर झाला. यात पुणे बोर्ड अंतर्गत लोणावळा केंद्राचा (ता. मावळ) निकाल 95.11 टक्के लागला आहे. खास बाब म्हणजे लोणावळा केंद्रातील इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. बारावी परीक्षेत लोणावळा विभागात यंदा कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखा मिळून 1 हजार 331 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1 हजार 266 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कला शाखेचा निकाल सर्वात कमी 79.10 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 97.16 टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल 95.35 टक्के लागला आहे. लोणाळाजवळील तुंगार्ली येथील डॉन बास्को हायस्कूल कला आणि वाणिज्य शाखेचा, ऑल सेंट चर्च हायस्कूल विज्ञान शाखा, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, रायवूड इंटरनॅशनल हायस्कूल या विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ( HSC Result 2024 Passing percentage increased in Lonavla center 100 percent result of 3 English schools )
व्हीपीएसच्या डी. पी. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल 97.46 टक्के तर वाणिज्य शाखेचा 97.62 टक्के निकाल लागला आहे. लोणावळा महाविद्यालयाचा निकाल 71.05 टक्के लागला असून मळवली येथील शांतीदेवी गुप्ता विद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल 88.35 टक्के लागला आहे. कार्ला येथील एकविरा विद्या मंदिरचा 94.11 टक्के निकाल लागला आहे, तर संपर्क लिली इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल 92.59 टक्के निकाल लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे लोणावळा केंद्रात कला, वाणिज्य तसेच विज्ञान शाखांमध्ये उत्तीर्णांचा टक्का वाढला आहे.
मावळचा निकाल –
बारावी निकालाबाबत मावळ तालुक्याची आकडेवारी देखील समोर आली आहे. मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.72 टक्के इतका लागला आहे. मावळ तालुक्यातील 4065 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 3791 विद्यार्थी पास झाले आहेत. 299 विद्यार्थी डिस्टिंक्सनमध्ये आले असून 993 विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवून पास झाले आहेत.
राज्याचा निकाल –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Exam 2024 Result) आज (दि. 21 मे) जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा इयत्ता बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यात सर्वाधिक 97.51 टक्के निकाल कोकण विभागाचा, तर सर्वाधिक कमी 91.95 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
अधिक वाचा –
– पुणे हिट अँड रन केस : पुणे शहरातील ‘ते’ दोन पब बंद करण्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune Hit and Run Case
– ‘राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले असते तर…’, निकालाआधीच श्रीरंग बारणेंनी राष्ट्रवादीकडे दाखवले बोट । Maval Lok Sabha
– बारावी बोर्ड परीक्षेत करिना देवकर प्रथम, कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा यंदा 94 टक्के निकाल