व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बारावी निकाल : लोणावळा केंद्रात यंदा उत्तीर्णांचा टक्का वाढला, तीन विद्यालयांचा निकाल शंभर टक्के, वाचा सविस्तर । HSC Result 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Exam 2024 Result) मंगळवारी (दि. 21 मे) जाहीर झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 23, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
SSC-HSC-Exam-Result

File Image


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Exam 2024 Result) मंगळवारी (दि. 21 मे) जाहीर झाला. यात पुणे बोर्ड अंतर्गत लोणावळा केंद्राचा (ता. मावळ) निकाल 95.11 टक्के लागला आहे. खास बाब म्हणजे लोणावळा केंद्रातील इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. बारावी परीक्षेत लोणावळा विभागात यंदा कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखा मिळून 1 हजार 331 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1 हजार 266 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कला शाखेचा निकाल सर्वात कमी 79.10 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 97.16 टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल 95.35 टक्के लागला आहे. लोणाळाजवळील तुंगार्ली येथील डॉन बास्को हायस्कूल कला आणि वाणिज्य शाखेचा, ऑल सेंट चर्च हायस्कूल विज्ञान शाखा, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, रायवूड इंटरनॅशनल हायस्कूल या विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ( HSC Result 2024 Passing percentage increased in Lonavla center 100 percent result of 3 English schools )

व्हीपीएसच्या डी. पी. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल 97.46 टक्के तर वाणिज्य शाखेचा 97.62 टक्के निकाल लागला आहे. लोणावळा महाविद्यालयाचा निकाल 71.05 टक्के लागला असून मळवली येथील शांतीदेवी गुप्ता विद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल 88.35 टक्के लागला आहे. कार्ला येथील एकविरा विद्या मंदिरचा 94.11 टक्के निकाल लागला आहे, तर संपर्क लिली इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल 92.59 टक्के निकाल लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे लोणावळा केंद्रात कला, वाणिज्य तसेच विज्ञान शाखांमध्ये उत्तीर्णांचा टक्का वाढला आहे.

मावळचा निकाल –
बारावी निकालाबाबत मावळ तालुक्याची आकडेवारी देखील समोर आली आहे. मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.72 टक्के इतका लागला आहे. मावळ तालुक्यातील 4065 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 3791 विद्यार्थी पास झाले आहेत. 299 विद्यार्थी डिस्टिंक्सनमध्ये आले असून 993 विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवून पास झाले आहेत.

राज्याचा निकाल –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Exam 2024 Result) आज (दि. 21 मे) जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा इयत्ता बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यात सर्वाधिक 97.51 टक्के निकाल कोकण विभागाचा, तर सर्वाधिक कमी 91.95 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.

अधिक वाचा –
– पुणे हिट अँड रन केस : पुणे शहरातील ‘ते’ दोन पब बंद करण्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune Hit and Run Case
– ‘राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले असते तर…’, निकालाआधीच श्रीरंग बारणेंनी राष्ट्रवादीकडे दाखवले बोट । Maval Lok Sabha
– बारावी बोर्ड परीक्षेत करिना देवकर प्रथम, कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा यंदा 94 टक्के निकाल


Previous Post

अनधिकृत होर्डींग जमीनदोस्त करण्याच्या मोहिमेचा अखेर श्रीगणेशा ! वडगाव नगरपंचायतीकडून कारवाईला सुरुवात । Vadgaon Maval

Next Post

पवना धरणात 27 टक्के पाणीसाठा ! पावसाची चाहूल लागल्याने काळजीचं कारण नाही, पण… । Pavana Dam

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana-Dam-Maval

पवना धरणात 27 टक्के पाणीसाठा ! पावसाची चाहूल लागल्याने काळजीचं कारण नाही, पण... । Pavana Dam

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
crime-arrested

गांजा विक्री प्रकरणी एकाला रंगेहात अटक, एका महिलेवर देखील गुन्हा दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.