पवन मावळ विभागातील अनेक गावं आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरणात सध्या 27.29 टक्के पाणीसाठा (दि. 20मे) उपलब्ध आहे. परंतू जूनपासून पाऊस सुरू होण्याची चाहूल लागल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे चिंतेचं कारण नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पिंपरी-चिंचवड शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपातळीत वाढ न झाल्याने मागील साडेचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन महापालिकेने आंद्रा धरणातून शंभर एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून 167 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्यात येत आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून केवळ 50 एमएलडी पाणी निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत आहे. ( 27 percent water storage in Pavana Dam Maval Updates )
पवना धरणात सध्या 27.29 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 29.27 टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी पाणी साठ्यात घट झाली असल्याची नोंद आहे. हा पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. सध्या नागरिकांना पुरेसे पाणी दिले जात असल्याचे महापालिका सांगत आहे. जून महिन्यापर्यंत पाऊस पडल्यास पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यास शहराला पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
अधिक वाचा –
– पुणे हिट अँड रन केस : पुणे शहरातील ‘ते’ दोन पब बंद करण्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune Hit and Run Case
– ‘राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले असते तर…’, निकालाआधीच श्रीरंग बारणेंनी राष्ट्रवादीकडे दाखवले बोट । Maval Lok Sabha
– बारावी बोर्ड परीक्षेत करिना देवकर प्रथम, कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा यंदा 94 टक्के निकाल