पवनानगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी, (दि. २१ मे) दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत पवना ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स पवनानगर येथील कॉलेजने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
विज्ञान शाखेचे हे तिसरे वर्ष असून तीनही वर्षे या विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असल्याची माहिती प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी दिली. कॉलेजचा निकाल खालीलप्रमाणे ;
विज्ञान विभाग – १०० टक्के निकाल
प्रथम क्रमांक – कालेकर ओंकार कैलास – ६९.६७%
व्दितीय क्रमांक – कालेकर सार्थक मारुती – ६७.३३ %
तृतीय क्रमांक – कडू किरण काशिनाथ – ६०.५० %
वाणिज्य विभाग – ९४.८२ टक्के
प्रथम क्रमांक – कु.खराडे रोशनी संतोष -६७.८३%
व्दितीय क्रमांक – काळवीट सोनाली शंकर – ६६.५०%
तृतीय क्रमांक – कु.तुपे विना लहू – ६५.६७%
कला विभाग – ६३.८८ टक्के
प्रथम क्रमांक – कु.ढोरे अंकिता दत्तात्रय – ७४.७३%
व्दितीय क्रमांक – घारे अक्षदा सुनील – ६६.१७%
तृतीय क्रमांक – कु.सुतार साक्षी सुभाष – ६२.६७ %
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे , सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के व पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले. ( Pavana Junior College Pavananagar Maval Taluka HSC Exam 12th Result 2024 Updates )
अधिक वाचा –
– बारावी बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विशेष उपक्रम सुरु, जाणून घ्या
– बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांवर कारवाई, तळेगाव दाभाडे पोलिसांची दबंग कामगिरी । Talegaon Dabhade Police
– सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली शिंदे यांची निवड । Maval News