महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (दि. 27 मे) जाहीर करण्यात आला. यंदाही तळेगाव येथील सरस्वती शिक्षण संस्थेचे सरस्वती विद्या मंदिर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दहावी शालांत परीक्षेत यंदाही सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या खालील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.
प्रथम क्रमांक: गावडे विश्वजीत विष्णू 97.60%
द्वितीय क्रमांक :क्षीरसागर समीक्षा शरद 96%
तृतीय क्रमांक: पंडित ईश्वरी धैर्यशील 95.80%
19 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत.
सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश जी झेंड, उपाध्यक्ष श्री दिलीप काका कुलकर्णी , कार्यवाह प्रमोद देशक व इतर संस्था चालकांनी सरस्वती विद्या मंदिर मधील मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी या सर्वांचं सरस्वती शिक्षण संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले. ( SSC 10th Result 2024 100 percent result of Saraswati Vidya Mandir School Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
– श्री पोटोबा महाराज मंदिर देवस्थान संस्थानच्या मुख्य विश्वस्त पदी किरण भिलारे यांची निवड । Vadgaon Maval
– मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित निवासी बाल वारकरी अध्यात्मिक संस्कार शिबिराची सांगता । Maval News
– तळेगाव नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यासाठी पथके तयार ! होर्डींग काढताना अडवणूक केल्यास कारवाई होणार