व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यासाठी पथके तयार ! होर्डींग काढताना अडवणूक केल्यास कारवाई होणार

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सक्रिय झाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 26, 2024
in लोकल, शहर
hoardings

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सक्रिय झाले आहे. तळेगावचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी यासाठी चार पथके तयार केली आहे. या पथकांकडून लवकरच शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

‘ज्या ठिकाणी अनाधिकृत होर्डिंग आहेत. त्या मालकांकडून होर्डिंग काढण्याचा खर्च घ्यावा, जर त्यांनी खर्च दिला नाही तर त्याच्या मालमत्ता करातून तो वसूल करावा, किंवा त्याचे पाणी कनेक्शन बंद करावे. होर्डिंग काढल्यानंतर स्ट्रक्चरसाठी वापरलेले स्टील नगर परिषदेमध्ये जमा करावे. तसेच जर कोणाला होर्डिंग लावायचे असेल तर नगर परिषदेची रीतसर परवानगी घ्यावी. ते लावण्याच्या सर्व नियम, अटी पूर्ण कराव्यात. तसेच कोणी अनधिकृत स्ट्रक्चर काढताना अडथळा आणला तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा,’ अशा स्पष्ट सुचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ( Action initiated to remove unauthorized hoardings within Talegaon Municipal Council limits )

मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या होर्डींग दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्या घटनेनंतर नगर परिषद प्रशासनाने तळेगाव हद्दीतील सर्व होर्डींगचे ऑडिट केले, त्यात होर्डिंग्ज अनधिकृत आढळून आल्याने ते काढण्याचा कार्यवाही मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली आहे. नगररचनाकार विश्वजीत कदम, सहाय्यक गणेश कोकाटे, विरेंद्र नार्गुंडे, जयंत मदने, सिद्धेश्वर महाजन, माजी सभापती महेश फलके, शेखर मुऱ्हे आदी यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– गाव करी ते राव काय करी ! कुसगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने प्रशासनाची धावपळ, 10 जूनपर्यंत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन
– महत्वाची बातमी ! सोमवारी दुपारी 1 वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल, बोर्डाकडून घोषणा । SSC Result 2024
– पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर प्रशासनाचे कठोर पाऊल ! तब्बल 32 रूफटॉप, पब आणि बार केले सील । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी ! बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे 27 मे पासून अर्ज भरता येणार, वाचा अधिक

Next Post

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित निवासी बाल वारकरी अध्यात्मिक संस्कार शिबिराची सांगता । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka Warkari Sampradaya

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित निवासी बाल वारकरी अध्यात्मिक संस्कार शिबिराची सांगता । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.