व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर प्रशासनाचे कठोर पाऊल ! तब्बल 32 रूफटॉप, पब आणि बार केले सील । Pune News

कल्याणीनगर, पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील 3 दिवसात 14 पथकांमार्फत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत 32 विविध परवाना कक्ष अनुज्ञप्तीवर गुन्हे दाखल केले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 25, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Rooftop pub bar

File Image


कल्याणीनगर, पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील 3 दिवसात 14 पथकांमार्फत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत 32 विविध परवाना कक्ष अनुज्ञप्तीवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या अनुज्ञप्तींचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्यात आले असून सर्व अनुज्ञप्ती सील करण्यात आलेल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

या कारवाईत 10 रूफटॉप, अंदाजे 16 पब, इतर 6 परवाना कक्ष बार अशा एकूण 32 अनुज्ञप्तींचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्याचे आदेश पारित केले असून सर्व अनुज्ञप्ती सील करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात धडक मोहिम राबविण्यात येत आहे. ( Pune Porsche Car Accident Case 32 Rooftop Pub Bar Seals from State Excise Department )

राज्य उत्पादन शुल्क विभागांकडून वारंवार अनुज्ञप्तींच्या गैरव्यवहाराबाबत कारवाई करण्यात येते. कोझी बारवर आता अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद केल्याची कारवाई केलेली असली तरी दोन महिन्यापूर्वीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने विभागीय गुन्हा नोंद केलेला आहे. 2023-2024 मध्ये राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून एकूण 297 अनुज्ञप्तीवर विविध कारणांसाठी गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 1 कोटी 12 लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. 17 अनुज्ञप्तींवर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली असून 2 अनुज्ञत्या कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत.

एप्रिल २०२४ पासून आजतागायत 54 अनुज्ञप्त्यांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले असून 5 लाख रुपये इतका दंड वसुल केलेला आहे. यात एकूण 32 अनुज्ञप्त्या सील करण्यात आलेल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग नियोजनबद्ध कारवाई करीत असून अनुज्ञप्ती विहीत वेळेनंतर सुरू ठेवणे, अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणे, अवैध ठिकाणांवर (रुफटॉपवर) मद्यविक्री करणे या बाबत सर्व पथकांकडून तपासणी मोहिम सुरू आहे.

विभागाकडे मद्यसेवन परवाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असून ऑनलाईन पद्धतीनेही exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून देखील मद्यपरवाने देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वरील गैरव्यवहारासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉटसअप क्रमांक 8422001133 वर तक्रार देण्याचे आवाहान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी केले आहे.

अधिक वाचा –
– पाण्यात स्टंट करणे जीवावर बेतले, महाविद्यालयीन तरूणाचा तळेगाव येथील तलावात बुडून मृत्यू । Talegaon Dabhade
– शिक्षणाला वय नसते.. मावळमध्ये 58 वर्षांच्या आजीबाई झाल्या बारावी पास ! मार्क पाहून तुम्हीही म्हणाल, आज्जी ‘अभिनंदन’
– पवना ज्युनिअर कॉलेजची उज्वल निकालाची परंपरा कायम, सलग तिसऱ्या वर्षी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, वाचा अधिक


dainik maval jahirat

Previous Post

धक्कादायक ! मैदानावर क्रिकेट खेळत असताना हार्ट अटॅक आल्याने मावळ तालुक्यातील क्रिकेटपटूचे निधन । Maval News

Next Post

महत्वाची बातमी ! सोमवारी दुपारी 1 वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल, बोर्डाकडून घोषणा । SSC Result 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
HSC-SSC-Exam

महत्वाची बातमी ! सोमवारी दुपारी 1 वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल, बोर्डाकडून घोषणा । SSC Result 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.