मावळ तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. तर, काही गावांत या योजनेची कामे सुरु आहेत. त्यातही काही ठिकाणी पाणी योजना ही कासव गतीने पुढे जाताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिकांना नाहक त्रास होतो आहे. पाण्यासाठी पायपीट घडत आहे. मावळ तालुक्यातील डोंगरगाव कुसगाव येथील पाणी पुरवठा योजनेचे काम देखील असेच मागील दोन वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. यासह जे काम झाले आहे, तेही समाधानकारण नाही, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कुसगाव ग्रामपंचायतीने याबाबत वारंवार संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार करत तक्रार केली होती. तसेच अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन निवेदने देखील दिली होती. परंतू प्रशासनाने काही ठोस पाऊल उचलल्याचे दिसून आले नाही. संबंधित योजना विभाग आणि ठेकेदार ग्रामपंचायतीचे म्हणणेच ऐकून घेत नसल्याचे गावकरी सांगतात. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. ( Jal Jeevan Mission Yojana Kusgaon Gram Panchayat Maval Taluka )
कुसगावकरांच्या या आक्रमक पवित्र्याने अखेर प्रशासन ठिकाणावर आले असून त्यांनी ग्रामपंचायतीचे म्हणणे रितसर ऐकूण घेत समजून घेतले आहे. तसेच ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्याने संबंधित विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले असून बंद असलेली कामे तत्काळ सुरु करण्यात येत आहेत. तसेच लवकरात लवकर हे काम मार्गी लावणार असल्याचेही आश्वास दिले आहे.
ग्रामस्थांच्या आंदोलनात स्वतः मावळचे आमदार सुनिल शेळके हे देखील सहभागी होणार असल्याचे समोर आल्याने प्रशासनाने तातडीने यात लक्ष घालत कामाला सुरुवात केली. कुसगाव ग्रामपंचायत च्या सरपंच अश्विनी गुंड, उपसरपंच सूरज केदारी, सदस्य ज्ञानेश्वर गुंड, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश काटकर यांनी याप्रकरणी पुढाकार घेतला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उप विभाग अभियंता यांनी सदरचे काम 10 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देखील दिले आहे.
अधिक वाचा –
– धक्कादायक ! मैदानावर क्रिकेट खेळत असताना हार्ट अटॅक आल्याने मावळ तालुक्यातील क्रिकेटपटूचे निधन । Maval News
– शाब्बास आर्यन ! लोणावळ्याचा आर्यन दळवी गणित विषयात राज्यात प्रथम, अभिनंदनाचा होतोय वर्षाव । Lonavala News
– पाण्यात स्टंट करणे जीवावर बेतले, महाविद्यालयीन तरूणाचा तळेगाव येथील तलावात बुडून मृत्यू । Talegaon Dabhade